गांधीनगर,ता. 25 जुलै : पाटीदार आंदोलनाचे नेते हार्दीक पटेल यांना गुजरातल्या विसनगर कोर्टाने सरकारी संपत्तीचं नुकसान केल्याप्रकरणी दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. दंगल भडकावने आणि जाळपोळ करणे असे आरोपही हार्दीक आणि त्यांच्या दोन सहाकाऱ्यांवर ठेवण्यात आले आहेत. त्याचबोरबर प्रत्येकाला प्रत्येकी 50 हजारांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. ही शिक्षा दोन वर्षांची असल्याने हार्दीक, लालजी आणि ए.के. पटेल यांना जामीनासाठी अर्ज केला आणि त्याला तात्काळ जामीनही मंजूर करण्यात आला.पाटील समाजाच्या आंदोलनादरम्यान मेहसाणा जिल्ह्यातल्या विषनगरचे भाजप आमदार ऋषिकेश पटेल यांच्या कार्यालयाची तोडफोड केल्याचं हे प्रकरण आहे. हार्दीक पटेल आणि त्यांचे सहकारी याला जबाबदार आहेत असा त्यांच्यावर आरोप होता.
आंदोलनाच्या सुरवातीला एकत्र असलेले हार्दीक पटेल यांच्या या जवळच्या सहकार्यांनी आता त्यांच्यापासून वेगळे झाले आहेत. हार्दीक हे पाटीदार आंदोलन अनामत समितीचे नेते झाले तर लालजी पटेल यांनी सरदार पटेल ग्रुपची स्थापना केली. 23 जुलै 2015 ला पाटीदार आंदोनाची ठिणगी पडली आणि त्याचा वणवा पूर्ण राज्यभर पसरला होता. गुजरात विधानसभेच्या निवडणूकीत हार्दीक पटेल प्रत्यक्ष उतरला नसला तरी त्याने काँग्रेससाठी जोरदार प्रचार केला होता आणि भाजपच्या तोंडाला फेस आणला होता.
हेही वाचा...
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा