हार्दिक पटेलच्या कथित व्हिडिओनं गुजरात निवडणुकीचं वातावरण पुन्हा तापलं

निवडणुकीमुळे तापलेल्या गुजरातमध्ये हार्दिक पटेलच्या आणखी एका कथित सेक्स व्हिडिओने खळबळ उडवून दिलीय. विशेष म्हणजे स्वतः हार्दिक पटेलनेच काही दिवसांपूर्वी आपल्याला बदनाम करण्यासाठी अशा प्रकारचा व्हिडीओ विरोधकांकडून व्हायरला केला जाऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली होती. आणि झालंही तसंच....गुजराती सोशल मीडियात हार्दिक पटेलचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झालाय.

Chandrakant Funde | News18 Lokmat | Updated On: Nov 13, 2017 08:58 PM IST

हार्दिक पटेलच्या कथित व्हिडिओनं गुजरात निवडणुकीचं वातावरण पुन्हा तापलं

13 नोव्हेंबर, गांधीनगर : निवडणुकीमुळे तापलेल्या गुजरातमध्ये हार्दिक पटेलच्या आणखी एका कथित सेक्स व्हिडिओने खळबळ उडवून दिलीय. विशेष म्हणजे स्वतः हार्दिक पटेलनेच काही दिवसांपूर्वी आपल्याला बदनाम करण्यासाठी अशा प्रकारचा व्हिडीओ विरोधकांकडून व्हायरला केला जाऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली होती. आणि झालंही तसंच....गुजराती सोशल मीडियात हार्दिक पटेलचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झालाय.

पाटीदार आंदोलनाचा पोस्टर बॉय असलेल्या हार्दिक पटेलने गुजरातमध्ये भाजपच्या विरोधात जोरदार आघाडी उघडलीय. आरक्षणच्या मागणीसाठी सुरू झालेलं हे पाटीदार समाजाचं आंदोलन भाजपला चांगलंच तापदायक ठरतंय. या पार्श्वभूमीवरच हार्दिक पटेलचा आणखी एक खासगी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. त्यात हार्दिक पटेल सारखा दिसणारा तरूण आणि एक तरूण एका हॉटेलच्या रूममध्ये एकत्रित बसून चर्चा करत असल्याचं स्पष्टपणे दिसतंय.

हा व्हिडीओ पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेलचाच असल्याचा प्रचार, सध्या व्हॉट्सअपवरून सुरु झाला आहे. दुसरीकडे स्वतः हार्दिकने मात्र हे घाणेरडं राजकारण असल्याचा दावा केला आहे. यासंबंधी खुलासा करणारं ट्विटही त्यानेही केलंय. भाजपने कितीही बदनाम केलं तर मला फरक पडत नाही पण त्यांनी गुजराथी महिलांचा अपमान करू नये, असं आवाहन हार्दिक पटेलनं या माध्यमातून केलंय.

 

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 13, 2017 08:38 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...