मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /Hardik Pandya and Natasa Stankovic Engagement : साखरपुड्याची बातमी ऐकून हार्दिकच्या बाबांना बसला आश्चर्याचा धक्का, म्हणाले...

Hardik Pandya and Natasa Stankovic Engagement : साखरपुड्याची बातमी ऐकून हार्दिकच्या बाबांना बसला आश्चर्याचा धक्का, म्हणाले...

हार्दिक आणि नताशा एकमेकांसोबत कायमचं हॉट आणि रोमॅण्टिक फोटो शेअर करत असतात. असाच एक किस करतानाच फोटो हार्दिकनं शेअर केला आहे.

हार्दिक आणि नताशा एकमेकांसोबत कायमचं हॉट आणि रोमॅण्टिक फोटो शेअर करत असतात. असाच एक किस करतानाच फोटो हार्दिकनं शेअर केला आहे.

नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशीच हार्दिक पांड्याने फिल्मी स्टाईलनं नताशाला प्रपोज केले.

मुंबई, 04 जानेवारी : भारतीय अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पांड्याने नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशीच आपल्या गर्लफ्रेंडला प्रपोज केलं. हार्दिक आणि नताशा स्टान्कोविच (Hardik Pandya and Natasa Stankovic Engagement) यांचा साखरपुडा सर्वांनाच धक्का देणारा होता. यावर आता हार्दिक पांड्याच्या बाबांनी धक्कादायक खुलासा केला आहे.

टीम इंडियाचा स्टायलिश अष्टपैलू हार्दिक पांड्या 1 जानेवारीला नताशासोबत फिल्मी स्टाईलनं साखरपुडा केला. इन्स्टाग्रामवर फोटो अपलोड करत हार्दिकनं चाहत्यांना ही बातमी दिली. मात्र हार्दिकचे बाबा हिमांशू पांड्या यांनी, साखरपुड्याबाबत आपल्याला काहीच माहित नसल्याचे सांगितले आहे. हार्दिकच्या साखरपुड्याची बातमी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीसाठीही धक्कादायक होती. आता त्याचे वडील हिमांशु यांनी, बॉम्बे टाईम्सला, "नताशा खूप छान मुलगी आहे. आम्ही तिला बर्‍याचदा मुंबईत भेटलो आहोत. आपल्या दोघांनाही माहित होतं की ते दोघे सुट्टी दुबईत घालवणार आहेत. पण ते साखरपुडा करणार आहेत याबाबत काहीच माहिती नव्हती. ", असे सांगितले.

 
View this post on Instagram
 

Mai tera, Tu meri jaane, saara Hindustan. 👫💍 01.01.2020 ❤️ #engaged

A post shared by Hardik Pandya (@hardikpandya93) on

विराट कोहली म्हणाला, ‘शॉक दिलास’

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने हार्दिक पांड्या आणि नताशा स्टान्कोविचचे अभिनंदन करताना ट्विट केले की, 'हार्दिक अभिनंदन, काय आनंददायी आश्चर्य आहे? भविष्यासाठी शुभेच्छा. टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची पत्नी साक्षी धोनीसह आयपीएल टीम मुंबई इंडियन्सनेही हार्दिक आणि नताशाचे अभिनंदन केले. हार्दिकने आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना सप्टेंबर 2019 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरूद्ध खेळला होता.

‘वेडेपणाच्या जगात आपले स्वागत आहे’

हार्दिकनं सोशल मीडियावर एंगेजमेंटचा रोमँटिक VIDEO टाकला होता. यावेळी हार्दिकचा भाऊ कृणाल पांड्याही उपस्थित होता. मात्र पांड्याने एक नवा फोटो ट्विट करत, 'हार्दिक आणि नताशाचे अभिनंदन. नताशा, आम्हाला आनंद झाला की तु आमच्या वेड्या कुटुंबात सामील झाली आहेस. वेडेपणाच्या जगात आपले स्वागत आहे. तुम्ही दोघांना खूप प्रेम’. या ट्विटसह, क्रुणाल पंड्या यांनी हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविचबरोबर स्वत: चे एक चित्रही शेअर केले आहे. इंडियन प्रीमियर लीगमध्ये क्रुणाल आणि हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सकडून मैदानात उतरले आहेत.

'साऱ्या हिंदुस्तान'ला कळवलं

नव्या वर्षाच्या आधी हार्दिक पांड्याने इन्स्टाग्रामवर नताशासोबत एक फोटो शेअर केला होता. पण 1 तारखेला संध्याकाळी त्याने आणखी काही फोटो शेअर करत आपली कमिटमेंट सिद्ध केली. Mai tera, Tu meri jaane, saara Hindustan. 01.01.2020 ❤️ #engaged असं लिहित त्यानं फोटो शेअर केले आहेत. रोमँटिक गाण्याच्या सुरात दोघं नाचताना दिसत आहेत. हार्दिकने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये नताशा आणि हार्दिक नवीन वर्षाची सुरुवात अशा रोमँटिक अंदाजात करताना दिसले. पांड्याने सकाळी शेअर केलेल्या फोटोसोबत एक कॅप्शन दिली होती. त्यात म्हटलं होतं की, नव्या वर्षाची सुरुवात माझ्या 'फायरवर्क'सोबत. यासोबत त्याने लव्हचा इमोजीसुद्धा शेअर केला होता. त्याच्या या फोटोवर भारताच्या क्रिकेटपटूंसह पांड्याच्या मित्र-मैत्रीणींनी कमेंट केल्या. त्यानंतर संध्याकाळी हार्दिक हार्दिकने आणखी काही फोटो शेअर केले.

First published:
top videos