मोदी-शहा हेच प्रवीण तोगडियांना त्रास देताहेत- हार्दिक पटेल

मोदी-शहा हेच प्रवीण तोगडियांना त्रास देताहेत- हार्दिक पटेल

मोदी आणि शहा हेच प्रवीण तोगडिया त्रास देत आहेत, पण आपण या प्रकरणी तोगडियांच्या पाठिशी ठामपणे उभे राहू- हार्दिक पटेल

  • Share this:

16 जानेवारी, अहमदाबाद : पाटीदार आंदोलनाचे नेते हार्दिक पटेल यांनी प्रवीण तोगडिया यांची चंद्रमणी रुग्णालयात जाऊन भेट घेतलीय. राजस्थानचे पोलीस एका जुन्या खटल्यात प्रवीण तोगडियांना अटक करण्यासाठी काल अहमदाबादमध्ये आले असता तोगडिया अचानक बेपत्ता झाले होते.

अखेर रात्री दहा वाजता तोगडिया अहमदाबादमधल्याच चंद्रमणी रुग्णालयात बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. रात्री उशिरा त्यांना शुद्ध आल्यानंतर आज सकाळी त्यांनी हाताला सलाईन सुरू असतानाच पत्रकार परिषद घेतली आणि भाजप सरकारवर गंभीर आरोप केला. राजस्थान पोलिसांचा काल माझं एन्काऊंटर करण्याचा डाव होता, असा सनसनाटी आरोप तोगडियांनी यांनी केलाय. त्यावर मोदी आणि शहाच प्रवीण तोगडियांना त्रास देऊ पाहत असून हे त्याचेच षडयंत्र असल्याचा थेट आरोप हार्दिक पटेल यांनी केलाय.

तसंच या प्रकरणी आपण प्रवीण तोगडिया यांच्या पाठिशी ठामपणे उभे असल्याचंही हार्दिक पटेल यांनी सांगितलंय. काल सुद्धा हार्दिक पटेल याने प्रवीण तोगडिया यांच्या बेपत्ता होण्यावरून मोदी-शहांना थेट टार्गेट केलं होतं. प्रवीण तोगडिया गायब होऊनही भाजप सरकार गप्प का ? असा सवाल हार्दिक पटेलनं विचारला होता. मनमोहन सिंग यांच्या काळात प्रवीण तोगडिया अशा पद्धतीने गायब झाले असते तर भाजपने देशभरात दंगली घडवल्या असत्या. मग आता भाजप गप्प का ? असा सवाल हार्दिक पटेलनं उपस्थित केलाय.

सूत्रांच्या माहितीनुसार गुजरातच्या राजकारणात प्रवीण तोगडिया आणि मोदींचं कधीच पटलेलं नाही, अशातच आता हार्दिकच्या रुपाने आणखी एक मोदी विरोधक प्रवीण तोगडिया यांच्याबाजुने मैदानात उतरल्याने गुजरातच्या हिंदुत्व राजकारणात वेगळेच रंग भरलेले बघायला मिळणार आहेत.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 16, 2018 03:26 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading