मुंबईत रेलरोको आंदोलनामुळे हार्बर लाईनची सेवा विस्कळीत

आज मुंबईतील पूर्व उपनगरमधे रस्ता रोको तसेच रेल्वे रोको करण्यात आला.चेंबूर मधे या आंदोलनाची धग जास्त होती.आंदोलनकर्त्यांनी हार्बर मार्गावर गोवंडी ते चेंबूर स्थानकादरम्यान ठिकठिकाणी रेल रोको केले. त्यामुळे हार्बरची लोकल सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली.

Chandrakant Funde | Updated On: Jan 2, 2018 04:53 PM IST

मुंबईत रेलरोको आंदोलनामुळे हार्बर लाईनची सेवा विस्कळीत

02 जानेवारी, मुंबई : आज मुंबईतील पूर्व उपनगरमधे रस्ता रोको तसेच रेल्वे रोको करण्यात आला.चेंबूर मधे या आंदोलनाची धग जास्त होती.आंदोलनकर्त्यांनी हार्बर मार्गावर गोवंडी ते चेंबूर स्थानकादरम्यान ठिकठिकाणी रेल रोको केले. त्यामुळे हार्बरची लोकल सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली. गोवंडी ते चेंबूर दरम्यान लोकल ट्रेनवर दगडफेक सुद्धा करण्यात आली.चेंबूर अमर महल, वाशी नाका, घाटकोपरचे रमाबाई नगर,कामगार नगर येथे ईस्टर्न एक्प्रेस हायवे आणि सायन पनवेल महामार्गावर रस्ता रोको करण्यात आला.

चेंबूरच्या पीएल लोखंडे मार्गावर पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. यात तीन पोलीस जखमी झाले. मुलुंड आणि चेंबूरमध्ये 5 बेस्ट बसेसच्या काचा फोडण्यात आल्या. चेंबूर नाका येथे भाजप आणि शिवसेनेच्या कार्यालयावर आंदोलन करते चालून गेली या कार्यालयांची तोडफोड करण्यात आली. अमर महल जंक्शन जवळ पोलिसांनी काही आंदोलनकर्त्याना बळाचा वापर करून बाजूला काढले..या सर्व आंदोलनावर पोलिसांनी संयमाची भूमिका दाखवल्याने आंदोलन जास्त चिघळले नाही. या आंदोलनामुळे सामान्य मुंबईकरांना हकनाक त्रास होत आहे. संध्याकाळी कामावरून सुटलेल्या मुंबईकरांची घरी जाण्यासाठी मात्र पंचाईत होण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 2, 2018 04:53 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close