Home /News /news /

पाकमध्ये शाहिद आफ्रिदीने वाटले मास्क आणि साबण, हरभजनची रिअ‍ॅक्शन झाली VIRAL

पाकमध्ये शाहिद आफ्रिदीने वाटले मास्क आणि साबण, हरभजनची रिअ‍ॅक्शन झाली VIRAL

शाहिद आफ्रिदीने पाकिस्तानमध्ये मास्क आणि साबणाचं वाटप केले. त्याचे हे फोटो हरभजन सिंगने शेअर केले आहेत आणि त्याची रिअ‍ॅक्शन खूप व्हायरल झाली आहे.

    मुंबई, 26 मार्च : भारतीय संघातील अफलातून स्पीनर हरभजन सिंग सोशल मीडियावर नेहमी अ‍ॅक्टिव्ह असतो. सध्या कोरोनाची परिस्थिती आपल्या देशामध्ये गंभीर स्वरूप घेत आहे. पाकिस्तानात देखील कोरोना मोठ्या वेगाने पसरत आहे. त्यासंदर्भात हरभजनने केलेले ट्वीट सध्या खूप व्हायरल होत आहे. पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शाहिद आफ्रिदी देशामध्ये मास्क आणि साबण वाट आहे. हे फोटो हरभजनने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत हरभजनने असं कॅप्शन दिलं आहे की,'मानवतेसाठी शाहिद आफ्रिदी महान कार्य करत आहे. सर्वजण जगाच्या चांगल्यासाठी प्रार्थना करत आहेत.' हरभजनच्या या फोटोला खूप लाइक मिळाले आहेत. अनेकांनी यावर प्रतिक्रिया देत आफ्रिदीचं कौतुक केलं आहे. शाहिद आफ्रिदीने सुद्धा त्याचे हे फोटो ट्विटरवरून शेअर केले आहेत. ज्यामध्ये त्यांनी कोरोनाला संपवण्यासाठी एकत्र काम करू, असं आवाहन केलं आहे. सध्या भारतात कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या वाढून 562 झाली आहे, तर 9 जणांचा यात मृत्यू झाला आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या