मतदानाच्या 48 तास आधी गौतमवर ‘गंभीर’ आरोप, 'या' क्रिकेटपटूंकडून पाठराखण

भाजपकडून पूर्व दिल्लीतून उमेदवारी देण्यात आलेला माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर याच्यावर आपच्या नेत्या आणि उमेदवार आतिशी मार्लेना यांनी गंभीर आरोप केले.

News18 Lokmat | Updated On: May 10, 2019 02:49 PM IST

मतदानाच्या 48 तास आधी गौतमवर ‘गंभीर’ आरोप, 'या' क्रिकेटपटूंकडून पाठराखण

नवी दिल्ली, 10 मे : भाजपकडून पूर्व दिल्लीतून उमेदवारी देण्यात आलेला माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर याच्यावर आपच्या नेत्या आणि उमेदवार आतिशी मार्लेना यांनी गंभीर आरोप केले. आतिशी यांनी गंभीरच्या समर्थकांनी पत्रक वाटप केल्याचा आरोप केला आहे.

आतिशी यांनी समर्थकांनी वाटलेल्या या पत्रकांमध्ये, त्यांच्या जातीबाबत, आई वडिलांबाबत, माझ्याबाबत अपशब्द वापरण्यात आले आहेत, असे सांगत असताना आतिशी यांना पत्रकार परिषदेत रडूही कोसळले. दरम्यान त्यांनी जी पत्रकं माझ्याविरोधात वाटली जात आहेत ती वाचणंही लज्जास्पद आहे असंही आतिशी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान या प्रकरणात गंभीरचा सहकारी आणि भारताचा आघाडीचा गोलंदाज हरभजन सिंग यानं त्याचं समर्थन करत, मला आश्चर्य वाटलं हे सगळं ऐकून , मी गंभीरला खुप वर्षांपासून ओळखतो. तो असं काही करुच शकत नाही’’, असं ट्विट केलं आहे.त्याचबरोबर भारताचा माजी क्रिकेटपटू व्हि. व्हि. एस. लक्ष्मण यानंही गंभीरच्या समर्थनार्थ ट्विट केलं आहे. लक्ष्मणंही, ''गंभीर असं करु शकत नाही, तो नेहमीच महिलांचा आदर करतो'', असं म्हणत त्याची पाठराखण केली आहे.तर, गौतमनं या सगळ्या प्रकरणावर 'ही पत्रकं मी वाटली, हे जर सिद्ध झालं तर राजकारण सोडून देईन', मात्र आतिशी यांनी ते सिद्ध करुन दाखवावं. 23 मे पर्यंत सिद्ध करू शकल्या नाहीत तर केजरीवाल यांनी राजकारणाचा राजीनामा देतील का? असं आव्हान केलं आहे.

वाचा- आयपीएलमुळं भंगलं 'या' खेळाडूचं वर्ल्ड कप खेळण्याचं स्वप्न, पण मुंबई इंडियन्स करणार मदत

वाचा- IPL 2019 : 'हे' चार भारतीय खेळाडू ठरवतील फायनलचं भवितव्य

वाचा- CSK vs DC : रिषभ पंतला रोखण्यासाठी ‘हा’ आहे धोनीचा मास्टरप्लॅन


VIDEO: ...तर अरविंद केजरीवाल राजकारण सोडणार का? गौतम 'गंभीर' आव्हान

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 10, 2019 02:40 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...