भारत नाही तर कसोटीत 'हा' संघ सर्वोत्तम, दादाच्या ट्विटवर हरभजनचा रिप्लाय

अॅशेस मालिकेनं प्रभावित झालेला भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने या मालिकेमुळं कसोटी क्रिकेट जिवंत ठेवलं असं म्हटलं होतं.

News18 Lokmat | Updated On: Aug 20, 2019 07:59 PM IST

भारत नाही तर कसोटीत 'हा' संघ सर्वोत्तम, दादाच्या ट्विटवर हरभजनचा रिप्लाय

नवी दिल्ली, 20 ऑगस्ट : अॅशेस कसोटी मालिकेला 1 ऑगस्ट पासून सुरूवात झाली. त्याच कसोटीपासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धा सुरू झाली. दोन वर्षे ही स्पर्धा होणार आहे. दरम्यान अॅशेस मालिकेनं क्रिकेट चाहत्यांची मनं जिंकली आहेत. यात इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांनी चांगल्या खेळाचं प्रदर्शन केलं आहे. कसोटी क्रिकेटला सर्वोत्तम का म्हणावं याचं उदाहरण म्हणून अॅशेस मालिकेचं नाव घेता येईल. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने सुद्धा अॅशेस मालिकेचं कौतुक केलं होतं.

गांगुलीने ट्विटरवरून अॅशेस मालिकेनं कसोटी क्रिकेट जिवंत ठेवलं असं म्हटलं होतं. या ट्विटला रिट्वीट करत भारताचा फिरकीपटू हरभजन सिंगने जेव्हा संघ बलाढ्य असतील तेव्हाच सर्वोत्तम खेळ होऊ शकतो असं म्हटलं आहे. मात्र सध्या भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंड हे संघ हा दर्जा टिकवून ठेवू शकतात. या चारमध्ये सर्वात बलाढ्य एकमेव न्यूझीलंड हा संघ असल्याचं हरभजनसिंग म्हणाला.

अॅशेस मालिकेनं कसोटी क्रिकेटला जिवंत ठेवलं आहे. आता इतर देशांनी आपल्या खेळाचा दर्जा उंचावला पाहिजे असं भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीनं म्हटलं होतं. अॅशेस मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात ऑस्ट्रेलियानं 1-0 ने आघाडी घेतली आहे. पहिला सामना ऑस्ट्रेलियानं जिंकला तर दुसरा सामना अनिर्णित राहिला.

हरभजन सिंगने ज्या चार संघांची नावे घेतली आहेत ते चारही संघ एकदिवसीय क्रिकेट वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये होते. सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडने भारताला तर इंग्लंडने ऑस्ट्रेलियाला नमवून फायनल गाठली होती. वर्ल्ड कपच्या इतिहासात सर्वात रोमांचक असा सामना न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात झाला. सुपर ओव्हरपर्यंत रंगलेल्या थरारात इंग्लंडने वर्ल्ड कप जिंकला असला तरी न्यूझीलंड़ने सर्वांचे मन जिंकले होते. कर्णधार केन विल्यम्सनला सामनावीर पुरस्कार मिळाला होता.

Loading...

VIDEO:...तर मारलंच असतं, ठाणे महापौराच्या पदाधिकाऱ्याची मराठा कार्यकर्त्यांना धमकी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 20, 2019 07:59 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...