Home /News /news /

लग्नानंतर सुखी संसार करायचा आहे… मग जोडीदाराला सोडून दूर जा

लग्नानंतर सुखी संसार करायचा आहे… मग जोडीदाराला सोडून दूर जा

लग्नानंतर जोडीदारापासून दूर राहणं हा सुखी संसाराचा मंत्र आहे. जे दाम्पत्य एकमेकांपासून दूर राहतात, त्यांचं नातं अतूट होतं, ते एकमेकांवर जिवापाड प्रेम करतात.

  लंडन, 26 जानेवारी : लग्नानंतर सुखी संसार करण्यासाठी जोडीदाराला सोडून द्या…. वाचूनच तुम्हाला थोडं आश्चर्य वाटलं असेल ना. एकमेकांपासून दूर राहून कसं बरं प्रेम वाढेल, संसार सुखाचा होईल, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. मात्र जे दाम्पत्य कामानिमित्त एकमेकांपासून दूर राहतात, त्यांचं नातं अतूट होतं, ते एकमेकांवर जीवापाड प्रेम करतात. यूकेतील टॅवलॉज हॉटेलचं सर्वेक्षण कामानिमित्त आपल्या जोडीदारापासून काही दिवस दूर राहणाऱ्या व्यक्तींचं सर्वेक्षण करण्यात आलं. यात सुमारे २००० व्यक्तींचा समावेश होता. जोडीदारापासून दूर राहिल्यानंतर या व्यक्तींना काय वाटतं, घरी परतल्यानंतर त्यांच्या जोडीदाराची काय भावना असते हे जाणून घेण्यात आलं. जोडीदारापासून दूर राहिल्याने प्रेम वाढते सर्वेक्षणातून दिसून आलं की, प्रत्येक १० पैकी ४ व्यक्ती ज्या आपल्या कामानिमित्त आपल्या जोडीदारापासून दूर राहत होत्या त्या आपल्या रिलेशनशिपबाबत आनंदी होत्या. या लोकांनी सांगितल्यानुसार, दूर राहिल्यानंतर जेव्हा ते आपल्या घरी परततात तेव्हा त्यांचं स्वागत खासप्रकारे होतं. टॅवेलॉज हॉटेलमध्ये काम करणारे ३५ वर्षांचे रिचर्ड स्कॉट अनेकदा ापल्या कामानिमित्त पत्नीपासून दूर जातात. एकत्र राहण्याप्रमाणे काही दिवस एकमेकांपासून दूर राहणंही गरजेचं आहे. यामुळे एकमेकांची कदर समजते, असं त्यांचं म्हणणं आहे. 5 दिवसांपेक्षा जास्त नसावा दुरावा तुम्हाला जोडीदाराचं जास्त प्रेम हवं म्हणून त्याच्यापासून भरपूर दिवस दूर राहू नका. काही झालं तरी त्यालाही वेळ देणं गरजेचंच आहे. त्यामुळे ५ दिवसांपेक्षा जास्त दिवस जोडीदारापासून लांब राहू नका, असंही या अभ्यासात सांगण्यात आलं आहे.
  अन्य बातम्या गर्भावस्थेत सेक्स करणं योग्य की अयोग्य? डॉक्टरांनी दिलेला सल्ला स्पर्म डोनेशनबाबत नवा रिचर्स समोर, आता मृत्यूनंतरही होऊ शकता ‘विकी डोनर’!
  Published by:Priya Lad
  First published:

  Tags: Lifestyle, Relationship

  पुढील बातम्या