Friendship Day 2019: या सवयींवरून तुम्हाला कळेल तुमचा मित्र स्वार्थी आहे की नाही...

Friendship Day 2019 कोणत्याही व्यक्तिला ओळखणं हे जगातलं सर्वात कठीण काम आहे. त्यातही गोष्ट जेव्हा आपल्या जवळच्या मित्र परिवाराची असेल तर प्रकरण अधिकच गंभीर होऊन जातं.

  • Share this:

कोणत्याही व्यक्तिला ओळखणं हे जगातलं सर्वात कठीण काम आहे. त्यातही गोष्ट जेव्हा आपल्या जवळच्या मित्र परिवाराची असेल तर प्रकरण अधिकच गंभीर होऊन जातं. या फ्रेंडशिप डेला तुम्हाला तुमच्या अशा मित्र- मैत्रिणींची आठवण येत असेल ज्यांनी तुम्हाला नात्यात दुखावलं. आता ही चूक तुम्हाला भविष्यात करायची नसेल तर पुढील गोष्टींकडे नीट लक्ष द्या. यावरून तुम्हाला तुमचा मित्र स्वार्थी आहे की नाही ते कळेल.

खरा मित्र तोच असतो जो तुम्हाला नेहमी चांगला आणि योग्य सल्ला देतो. ज्याला तुमच्या चांगल्या- वाईट गुणांची पूर्ण कल्पना असते. तसेच तुम्ही एखाद्या प्रसंगी कसे वागाल याचीही त्याला पूर्ण कल्पना असते. अशावेळी तो तुम्हाला अजून चिथवण्याऐवजी शांत करण्याचा प्रयत्न करेल. जर तुमचा मित्र स्वार्थी असेल तर तो नेहमीच तुम्हाला भडकवण्याचा प्रयत्न करेल. अशा लोकांपासून चार हात लांबच रहा.

जर तुमचा मित्र स्वार्थी असेल तर तो तुमच्याकडे तेव्हाच येईल जेव्हा त्याच्याकडे वेळ असेल. याउलट तुमची मैत्री प्रामाणिक असेल तर तुमच्या सुख दुःखात तो तुमची साथ नेहमीच देईल. तुमचे सर्व सिक्रेट तो स्वतःकडे राखून ठेवेल.

प्रामाणिक मित्रामध्ये काही कारणांमुळे अंतर जरी आले तरी तुमचे सिक्रेट तो कधीच दुसऱ्यांना सांगणार नाही. तसेच दोघं लाँग डिस्टन्समध्ये राहत असली तरी दोघांच्या मैत्रीत अंतर हे कारण कधीच येणार नाही. ते तुमच्यासोबत असो किंवा नसो, तुम्ही एकत्र शिका किंवा नको.. तसंच तुम्हाला भेटणं शक्य होईल किंवा नाही याचा मैत्रीमध्ये काहीच फरक पडत नाही. व्यग्र वेळापत्रकातून ते एकमेकांसाठी वेळ काढतातच. प्रत्येक कठीण प्रसंगात ते तुमच्यासाठी ठामपणे उभे असतात.

जे मित्र तुमच्यावर खरं प्रेम करतात ते तुमच्या कोणत्याही बोलण्यावर फार काळ चिडून राहणार नाही. तसंच ते तुमच्या पाठीमागे वाईट बोलणार नाही. जे मित्र स्वार्थी असतात ते नेहमीच तुमच्या पाठीमागे बोलताना दिसतील. छोट्याशा गोष्टींवरूनही ते तुमच्याशी भांडतील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 1, 2019 01:33 PM IST

ताज्या बातम्या