वडिलांच्या स्कूटरवरून फिरणाऱ्या विराटच्या ताफ्यात आहेत अलिशान कार, किंमत कोटींच्या घरात!

भारताचा कर्णधार विराट कोहली आज (5 नोव्हेंबर) त्याचा 31 वा वाढदिवस साजरा करत आहे. विराटला अलिशान कार खूप आवडतात. त्याच्या ताफ्यात महागड्या कार आहेत.

  • Share this:

भारताचा कर्णधार विराट कोहली आज (5 नोव्हेंबर) त्याचा 31 वा वाढदिवस साजरा करत आहे. क्रिकेटच्या तिनही प्रकारात सध्या कोहली अव्वल आहे. आता तो फलंदाजीला मैदानात उतरला की एखादा तरी विक्रम नोंदवूनच परततो. फक्त मैदानावरच नाही तर मैदानाबाहेरही त्याच्या नावावर अनेक विक्रम आहेत.

विराट कोहली सध्या भारतातील सर्वात श्रीमंत खेळाडूंपैकी एक आहे. त्याची सर्व स्वप्नं तो पूर्ण करत आहे. विराटला लग्झरी कार प्रचंड आवडतात. एकेकाळी वडिलांच्या स्कूटरवरून क्रिकेट अकॅडमीत जाणारा विराट आजा लग्झरी कारमधून जातो.

लग्झरी गाड्यांचा चाहता असलेल्या विराटच्या ताफ्यात एकापेक्षा एक सरस अशा गाड्या आहेत. कोहलीकडे ऑडीच्या लिमिटेड कलेक्शनमधील R8 LMX ही गाडी आहे. या गाडीची किंमत 2 कोटी 97 लाख इतकी आहे.

ऑडीची R8 V10 ही कारसुद्धा विराटकडे आहे. या गाडीत 5.2-litre V10 इंजिन असून 530 Nm आणि 517 hp इतकी पॉवर निर्माण करते. या कारची किंमत 2 कोटी रुपये आहे.

कारच्या या कलेक्शनमध्ये ऑडी कंपनीची Audi A8L या कारचा समावेश आहे. 1 कोटी 87 लाख रुपये किंमतीची ही कार A8 चे लॉन्ग व्हील बेस व्हर्जन आहे.

ऑडी कंपनीची Q7 ही कार विराटच्या आवडत्या कारपैकी एक आहे. Audi Q7 4.2 एक TDI प्रीमियम SUV गाडी आहे.

याशिवाय विराटच्या ताफ्यात टोयाटो फॉर्च्युनर सुद्धा आहे. जापानी ऑटोमेकर्सनी विराटला गिफ्ट म्हणून ही गाडी दिली होती.

लहान गाड्यांमध्ये विराटकडे रेनॉची डस्टर गाडी आहे. विराटला लंकेविरुद्धच्या मालिकेत मॅन ऑफ द सिरीज मिळाल्यानंतर गिफ्ट म्हणून ही कार देण्यात आली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 5, 2019 11:00 AM IST

ताज्या बातम्या