लोकसभा निवडणुकीसाठी उभा राहणार तनुश्री दत्ता? या पार्टीने केली मागणी

तनुश्रीने नाना पाटेकर यांच्यावर चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्याचा आरोप केला होता.

News18 Lokmat | Updated On: Mar 19, 2019 08:17 PM IST

लोकसभा निवडणुकीसाठी उभा राहणार तनुश्री दत्ता? या पार्टीने केली मागणी

मुंबई, 19 मार्च- तनुश्री दत्ताने स्वतःवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडली नसती तर आज लैंगिक शोषणाच्या भारतातील घटना समोर आल्या नसत्या. #MeToo वर बोलताना तुनश्रीने तिच्यावर झालेला अत्याचार मोकेळपणाने इतरांशी शेअर केला. तनुश्रीने नाना पाटेकर यांच्यावर चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्याचा आरोप केला होता. तनुश्रीनंतर इतर बॉलिवूड अभिनेत्रींनीही त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराला वाचा फोडली. यामुळे आलोक नाथ, साजिद खान, अनु मलिक, कैलाश खेर, रजत कपूर यांसारखे कलाकार #MeToo आरोपींच्या कचाट्यात अडकले.

बॉलिवूडमध्ये वादळ आणणारी तनुश्री आता लोकसभा निवडणुकींमुळे चर्चेत आली आहे. झारखंडमधील जनमत पार्टीला तनुश्रीने लोकसभा निवडणुक लढवावी असे वाटत आहे. जमशेदपूर येथून तिने उभं राहावं अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली.

याबद्दल पार्टीचे नेते सूर्यसिंह बेसरा म्हणाले की, तनुश्री ही जमशेदपुर येथील राहणारी आहे. तिचं प्राथमिक शिक्षण येथूनच पूर्ण केलं असून त्या परिसरात तनुश्री फार प्रसिद्धही आहे. सध्या जनमत पार्टी तनुश्रीशी चर्चा करत असून तिला लोकसभा निवडणुकीला उभं राहण्यासाठी मनवत आहेत. आता तनुश्री निवडणुकीसाठी उभी राहणार की नाही हे लवकरच स्पष्ट होईल.

VIDEO : मोदी-शहा सत्तेबाहेर गेलेच पाहिजे, राज ठाकरेंचं UNCUT भाषण


Loading...


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 19, 2019 08:17 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...