• होम
  • व्हिडिओ
  • रिंकू राजगुरूने सांगितला तिला आलेल्या प्रपोजलचा 'तो' भन्नाट किस्सा
  • रिंकू राजगुरूने सांगितला तिला आलेल्या प्रपोजलचा 'तो' भन्नाट किस्सा

    News18 Lokmat | Published On: Jun 3, 2019 05:39 PM IST | Updated On: Jun 3, 2019 05:39 PM IST

    मुंबई, 03 जून- सैराट फेम आर्ची अर्थात रिंकू राजगुरूचा आज वाढदिवस. संपूर्ण महाराष्ट्रात तिचा वाढदिवस फार उत्साहाने तिचे चाहते साजरा करत आहेत. दरम्यान, 'सैराट'नंतर आपल्याला अनेक प्रेमपत्रं मिळाली असल्याचं गुपीत तिने न्यूज18 लोकमतकडे शेअर केलं. 'अनेक जणांनी प्रेमपत्रं पाठवली, काही जणांनी तर रक्तांनी प्रेमपत्रं लिहून पाठवली होती' असा किस्साच रिंकूने यावेळी सांगितला. हे कमी की काय काहींनी तर त्यांचे फोटो आणि ते नोकरी कुठे करतात याची माहितीही पाठवली होती. दरम्यान, नुकताच तिच्या तिसऱ्या सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाला. मेकअप असं या सिनेमाचं नाव असून गणेश पंडित लिखीत आणि दिग्दर्शित मेकअप सिनेमाच्या या टीझरमध्ये रिंकू बांधकाम सुरू असलेल्या एका उंच इमारतीवर मद्यपान करताना दिसते. मद्यधुंद अवस्थेत ती शहराला आणि घरच्यांना शिव्याही देत आहे. तिला मेकअप करायला न दिल्याचा राग तिच्या प्रत्येक वाक्यात दिसतो.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading