...म्हणून ‘या’ दिग्गज मराठमोळ्या गायकाने माधुरीला दिला होता लग्नासाठी नकार

...म्हणून ‘या’ दिग्गज मराठमोळ्या गायकाने माधुरीला दिला होता लग्नासाठी नकार

माधुरीच्या आई- वडिलांना तिने सिनेमांत काम करू नये असं वाटत होतं. सिनेमांत काम करण्यापेक्षा माधुरीने लग्न करून संसार करावा अशी त्यांची इच्छा होती.

  • Share this:

मुंबई, 14 मे- बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षितचा उद्या १५ मे रोजी आपला वाढदिवस साजरा करत आहे. माधुरी बॉलिवूडची अशी एक अभिनेत्री आहे जिच्यासमोर इतर अभिनेत्री आणि अभिनेत्यांचा चार्म फिका पडेल. फक्त सौंदर्यातच नाही तर अभिनय आणि डान्समध्ये माधुरीचा हात कोणीही पकडू शकत नाही. आजही तिच्या सौंदर्याचे लाखो लोक दिवाने आहेत. पण एक वेळ अशी होती जेव्हा माधुरीच्या आई- वडिलांना तिने सिनेमांत काम करू नये असं वाटत होतं.

सिनेमांत काम करण्यापेक्षा माधुरीने लग्न करून संसार करावा अशी त्यांची इच्छा होती. म्हणून माधुरीसाठी ते मुलगाही शोधत होते. एकीकडे माधुरीला सिनेमांमध्ये काम करण्याची स्वप्न पडत होती तर दुसरीकडे तिचे आई- बाबा मात्र तिच्यासाठी एकाहून एक सरस मुलं शोधत होते.

तब्बल 12 वर्षांनंतर ब्रेकअपवर बोलला शाहिद, ‘तिच्यासोबतच्या ब्रेकअपनंतर आयुष्य ब्लॅक अँड व्हाइटसारखं झालं होतं.’

दरम्यान, माधुरीच्या वडिलांनी लग्नासाठी दिग्गज गायक सुरेश वाडकर यांना लग्नासाठी विचारले. एका वेबसाइटने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, बॉलिवूडमध्ये सुरेश वाडकर हे तेव्हा नवोदित गायक म्हणून नावारुपास येत होते. माधुरीच्या आई- वडिलांना सुरेश यांना लग्नाबद्दल विचारले असता, त्यांनी सरळ माधुरीला नकार दिला. लग्नाला नकार देताना सुरेश यांनी माधुरी फार बारीक असल्याचं कारण दिलं. हे नातं तुटल्यावर माधुरीच्या आई- वडिलांना अपार दुःख झालं. यानंतर तिच्या आई- वडिलांनी सिनेमात काम करण्याची परवानगीही दिली.

शाहरुख खानसोबत काम केलेल्या या सहा अभिनेत्रींचा झालाय मृत्यू, एकीचं वय तर होतं फक्त 22 वर्ष

यानंतर जो इतिहास घडला तो तर साऱ्यांनीच पाहिला. १९८४ मध्ये 'अबोध' सिनेमातून माधुरी दीक्षितने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. मात्र माधुरीला लगेच लोकप्रियता मिळाली नाही. जवळपास चार वर्षांनंतर 'तेजाब' सिनेमाने तिला खरी ओळख मिळाली. या सिनेमानंतर माधुरीने मागे वळून पाहिले नाही.

घटस्फोटानंतर 'ही' टीव्ही अभिनेत्री एकटी सांभाळतेय मुलीला

माधुरीने त्यानंतर 'राम लखन', 'परिंदा', 'दिल', 'साजन', 'बेटा', 'खलनायक', 'हम आपके हैं कौन', 'राजा' आणि 'दिल तो पागल है' या सारख्या सुपरहिट सिनेमांत काम केलं. अशा एक ना अनेक सिनेमांच्या माध्यमातून माधुरीने स्वतःला बॉलिवूडची सुपरस्टार म्हणून प्रस्थापित केलं. नुकताच माधुरीने ‘टोटल धमाल’ आणि ‘कलंक’ सारख्या सिनेमांत काम केलं.

SPECIAL REPORT: तापसी आणि भूमीचं अनोखं मदर्स डे सेलिब्रेशन

First published: May 14, 2019, 1:00 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading