नवी दिल्ली ०६ जानेवारी २०१९- वर्ल्ड कप... जेव्हाही हे शब्द कानावर पडतात तेव्हा सर्वातआधी कपिल देव यांचाचा चेहरा डोळ्यासमोर येतो. ६ जानेवारीला या महान अष्ट्रपैलू खेळाडूचा वाढदिवस असतो. कपिल हे एकक असे खेळाडू आहेत ज्यांच्याजवळ प्रत्येक परिस्थितीत संघाला सांभाळून घ्यायची हिंमत आहे. त्यांच्या याच गुणामुळे भारतीय टीमने १९८३ मध्ये वेस्टइंडीजला हरवत वर्ल्ड कपवर पहिल्यांदा आपलं नाव कोरलं.
मैदानावर कपिल देव यांच्या पराक्रमाचे अनेक किस्से आहेत. मात्र त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी आम्ही तुम्हाला ड्रेसिंग रूममधील अशी एक घटना सांगणार आहोत जी ‘शारजाह में ड्रेसिंग रूम कांड’ नावाने प्रसिद्ध आहे. १९८७ मध्ये हा किस्सा घडला. २००३ मध्ये दिलीप वेंगसरकर यांनी पहिल्यांदा एका सार्वजनिक कार्यक्रमात कपिल देव आणि दाऊद इब्राहिमचा हा किस्सा सांगितला होता.
१९८७ मध्ये शारजाहमध्ये दुसऱ्या दिवशी भारत- पाकदरम्यान एकदिवसीय सामना खेळला जाणार होता. सरावानंतर भारतीय संघ दुसऱ्या दिवसाच्या सामन्याची रणनिती आखत होती. याचवेळी बॉलिवूडचे अभिनेते महमूद, दाऊद इब्राहिमसोबत ड्रेसिंग रूममध्ये आले आणि खेळाडूंची भेट घालवून देत म्हटले की, ‘हा माझा मित्र आहे आणि तो इथेच व्यवसाय करतो.’
१९८७ मध्ये दाऊदची ओळख एक स्मग्लर म्हणून होती आणि अनेकांना त्याच्याबद्दल फारशी माहिती नव्हती. महमूदने खेळाडूंना सांगितलं की दाऊद त्यांना एक ऑफर देऊ इच्छितो आहे. यानंतर दाऊद म्हणाला की, ‘जर उद्याच्या सामन्यात भारताने पाकिस्तानला हरवलं तर प्रत्येकाला मी टोयोटा कोरोला कार भेट म्हणून देईन.’
याचवेळी कपिल देव ड्रेसिंग रूममध्ये आले आणि त्यांनी पहिल्यांदा महमूद यांना ड्रेसिंग रूमच्या बाहेर जायला सांगितले. त्यानंतर दाऊदकडे इशारा करुन म्हणाले की, हा कोण आहे? चल बाहेर जा. यावर दाऊद एकही शब्द न बोलता ड्रेसिंग रूमच्या बाहेर पडला.
चक्क शाळेच्या कार्यक्रमात थिरकल्या बारबाला; VIDEO VIRAL