Happy Birthday- फरहानच्या वाढदिवसालाच शिबानी दांडेकर करणार साखरपुडा?

गेल्या अनेक दिवसांपासून फरहान त्याची कथित प्रेयसी शिबानी दांदेकरसोबतच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहे.

  • Share this:

आज फरहान अख्तरचा ४५ वा वाढदिवस. गेल्या अनेक दिवसांपासून फरहान त्याची कथित प्रेयसी शिबानी दांदेकरसोबतच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहे. दोघंही यावर्षी लग्न करणार असल्याचं म्हटलं जात आहे. दोघंही त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एकमेकांसोबतचे फोटो शेअर करत असतात. मात्र अजूनही दोघांनी उघडपणे आपल्या नात्याचा स्वीकार केलेला नाही. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)

या दोघांबद्दल चर्चेला तेव्हा उधाण आलं जेव्हा शिबानीने तिच्या इस्टाग्राम अकाऊंटवरुन ‘मिस्ट्री मॅन’सोबतचा फोटो शेअर केला होता. नंतर तो दुसरा तिसरा कोणी नसून फरहान असल्याचं समजलं. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)

एका वेबसाइटने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, दोघंही या नात्याबद्दल फार गंभीर असून दोघंही लग्नाचा विचार करत आहेत. फरहानच्या मुलींनाही शिबानी आवडली आहे. त्यामुळे फरहान त्याच्या वाढदिवसालाच शिबानीसोबत साखरपुडा करू शकतो असं म्हटलं जात आहे. तर काहींच्या मते, दोघांनी या आधीच साखरपुडा केला आहे. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)

फरहानने इन्स्टाग्रामवर शिबानीसोबतचा हात पकडलेला फोटो शेअर केला होता. या फोटोत शिबानी कॅमेऱ्याकडे बघून चालताना दिसत आहे. या फोटोला फरहानने कॅप्शन लिहिलं नसून फक्त एक हार्ट इमोजी शेअर केली आहे. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)

शिबानीची फरहानसोबत पहिली भेट एका रिअलिटी शोमध्ये झाली होती. १६ वर्षांच्या लग्नानंतर फरहानने घटस्फोट घेतला. त्याला दोन मुली असून दोघीही पूर्व पत्नीसोबत राहतात. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)

२०१६ मध्ये फरहानने अधुना भंबानीशी घटस्फोट घेतला होता. यानंतर त्याचं नाव श्रद्धा कपूरशी जोडलं गेलं. शिबानी एक अँकर आणि गायिका आहे. तिने मराठी सिनेमात आयटम साँगही केले आहेत. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 9, 2019 09:54 AM IST

ताज्या बातम्या