मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

हा जल्लाद देणार निर्भयाच्या गुन्हेगारांना फाशी, आतापर्यंत 80हून अधिक आरोपींना पाठवलं यमसदनी!

हा जल्लाद देणार निर्भयाच्या गुन्हेगारांना फाशी, आतापर्यंत 80हून अधिक आरोपींना पाठवलं यमसदनी!

फाशी (Hanging)देण्याची तारीख आणि वेळही निश्चित करण्यात आला आहे. निर्भयाच्या आरोपींना कोण फाशी देणार हे जाणून घेण्याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे.

फाशी (Hanging)देण्याची तारीख आणि वेळही निश्चित करण्यात आला आहे. निर्भयाच्या आरोपींना कोण फाशी देणार हे जाणून घेण्याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे.

फाशी (Hanging)देण्याची तारीख आणि वेळही निश्चित करण्यात आला आहे. निर्भयाच्या आरोपींना कोण फाशी देणार हे जाणून घेण्याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे.

  • Published by:  Renuka Dhaybar
नवी दिल्ली, 10 जानेवारी : निर्भयाच्या (Nirbhaya) गुन्हेगारांच्या डेथ वॉरंट(Death Warrant) वर स्वाक्षरी करण्यात आली आहे.  फाशी (Hanging)देण्याची तारीख आणि वेळही निश्चित करण्यात आला आहे. निर्भयाच्या आरोपींना कोण फाशी देणार हे जाणून घेण्याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे. पवन नावाचे जल्लाद(Pawan Jallad) गुन्हेगारांना फाशी देणार असल्याची खात्री पटली आहे. इतकंच नाही तर फाशी देणारा पवन हे देखरेखीखाली आहे. याची जबाबदारी मेरठ जेल प्रशासनाला देण्यात आली आहे. पवन हे 20 जानेवारीपर्यंत कारागृह प्रशासनाच्या देखरेखीखाली असतील. त्यानंतर पवन यांना दिल्लीच्या (Delhi) तिहार (Tihar Jail) तुरूंगात  पाठवलं जाईल. दररोज द्यावी लागते हजेरी यूपी सरकारमधील जेलमंत्र्यांनी तिहार तुरूंग प्रशासनाला फाशी देण्यासाठी पवन फाशीदारास पाठवण्यास परवानगी दिली आहे. तेव्हापासून पवन यांना दररोज मेरठ कारागृहात ठेवलेल्या रजिस्टरवर हजेरी लावावी लागते. याचा अर्थ असा आहे की, जल्लाद पवन हे शहरातच आहेत. गुन्हेगारांना फाशी दिल्याशिवाय ते शहर सोडू शकत नाही असे स्पष्ट निर्देश त्यांना देण्यात आले आहेत. दिल्ली जाण्याआधी 2 वेळा होणार वैद्यकिय चाचणी जेलमध्ये असलेल्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 20 जानेवारीला पवन जल्लाद हे दिल्लीला जातील. पण त्याआधी त्यांची दोन वेळा वैद्यकीय चाचणी करण्यात येईल. मेरठ जेल प्रशासन पवन यांची चाचणी करेल. एकदा 20 जानेवारीला दिल्ली येथे येण्यापूर्वी चेकअप होईल आणि त्याआधी एकदा 14 ते 15 जानेवारी दरम्यान होईल. फाशी देण्यापूर्वी पवन यांच्या आरोग्याचीही काळजी घेतली जाईल. तीन आरोपींना एकट्या कोठडीमध्ये केलं शिफ्ट तुरूंगातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुकेश, पवन गुप्ता आणि अक्षय कुमार सिंगला कसुरी प्रभागात हलवण्यात आलं आहे. त्याचवेळी चौथा दोषी विनय याला अजूनही तुरूंग क्रमांक -4 च्या उच्च सुरक्षा कक्षात ठेवण्यात आले आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, मृत्यूच्या वॉरंटवर स्वाक्षरी झाल्यानंतर गुन्हेगारांना डेथ सेलकडे पाठवले जाते, परंतु दोन जणांनी नुकतीच सर्वोच्च न्यायालयात उपचारात्मक याचिका दाखल केली आहे, त्यावर अद्याप सुनावणी बाकी आहे म्हणून त्यांना मृत्यू कक्षात पाठवण्यात आले नाही तज्ञांच्या मते, तिहार कारागृहातील कसुरी सेलला 'तन्हाई बॅरेक'देखील म्हटले जाते. नराधमांना या सेलमध्ये एकटे ठेवले जाते. इतर कोणत्याही कैद्याला इथे जाण्याची परवानगी नाही. सेलच्या बाहेर सैनिक 24 तास पहारेकरीही ठेवतात. एकट्याने राहणारा गुन्हेगार इतर कैद्यांना भेटू शकत नाही.
First published:

Tags: Nirbhaya gang rape case

पुढील बातम्या