आता फाशी अटळ? राष्ट्रपतींनी निर्भयाचा दोषी पवनची दया याचिका फेटाळली

आता फाशी अटळ? राष्ट्रपतींनी निर्भयाचा दोषी पवनची दया याचिका फेटाळली

निर्भयाचा दोषी पवन कुमारने सर्व कायदेशीर पर्यायांचा अवलंब केल्यामुळे आता त्याच्याकडे कोणताही पर्याय उपलब्ध नाही

  • Share this:

नवी दिल्ली, 4 मार्च :  दिल्लीसह संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या निर्भया गँगरेप केसमधील (Nirbhaya Gang Rape Case) एक दोषी पवनकुमार गुप्ता याची क्युरेटिव्ह याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्यानंतर आज राष्ट्रपतींनी त्याची दया याचिकादेखील फेटाळली आहे. पवन कुमारने आतापर्यंत सर्व कायदेशीर पर्यायांचा अवलंब केला असून आता त्यांची फाशी अटळ असल्याचे सांगितले जात आहे.

संबंधित - फासावर लटकावण्याच्या 4 दिवस आधी पवन कुमारने ठोठावले सुप्रीम कोर्टाचे दार

फाशीची शिक्षा बदलून आजीवन कारावासाची शिक्षा द्यावी

पवनने गुन्हा केला तेव्हा तो अल्पवयीन असल्याचा दावा केला होता. त्यापार्श्वभूमीवर त्याच्या फाशीच्या शिक्षेत बदल करुन आजीवन कारावासाची शिक्षा द्यावी अशी विनंती करण्यात आली आहे. पवनचे वकील एपी सिंह यांनी क्युरेटिव्ह याचिका दाखल करीत सर्वोच्च न्यायालयाने दिलेली फाशीची शिक्षा फेटाळण्याची मागणी केली आहे. शुक्रवारी पवनने दाखल केलेल्या या याचिकेवर 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाने सुनावणी घेतली. चार दोषींपैकी पवन हा क्युरेटिव्ह याचिका करणारा शेवटचा गुन्हेगार आहे. फाशीऐवजी आजीवन कारावासाची शिक्षा द्यावी, अशी त्याची विनंती आहे.

संबंधित - निर्भया गॅंगरेप: चारही नराधमांना 3 मार्च रोजी सकाळी 6 वाजता फासावर लटकावणार

दिल्ली कोर्टाने 17 फेब्रुवारीला चारही दोषींना 3 मार्चला एकत्रित फाशी द्यायचा निर्णय दिला होता. आतापर्यंत कोर्टाने या चौघांसाठी तीन वेळा डेथ वॉरंट जारी केलं आहे. पहिल्या दोन वेळेला दोषींनी कायद्यानं ठोठावल्याने फाशीची तारीख पुढे ढकलावी लागली. तिसऱ्यांदा डेथ वॉरंट जारी झालं होतं. पण याहीवेळी फाशीच्या आधी दोन दोषींनी याचिका दाखल केल्या होत्या.

First published: March 4, 2020, 2:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading