S M L

विदर्भ-मराठवाड्यात गारपीटीची शक्यता; शेतकऱ्यांना खबरदारी घेण्याचं आवाहन

गेल्या दोन चार वर्षात अवेळी झालेल्या गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. त्यामुळे यावर्षी आधीच शेतकऱ्यांना खबरदारी घ्यावी असं आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आलंय. शेतमालाची योग्य प्रकारे साठवणूक केल्यास हे नुकसान टळू शकतं.

Chittatosh Khandekar | Updated On: Feb 9, 2018 08:58 AM IST

विदर्भ-मराठवाड्यात गारपीटीची शक्यता; शेतकऱ्यांना खबरदारी घेण्याचं आवाहन

09 फेब्रुवारी: विदर्भ आणि मराठवाड्यातील बहुतांशी भागात येत्या 10 ते 13 फेब्रुवारीदरम्यान गडगडाटासह वादळी वारे वाहून गारपीट होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी या पार्श्वभूमीवर तयार झालेल्या पिकांची कापणी करुन शेतमालाची योग्यरित्या साठवणूक करावी. सर्व नागरिकांनी वादळ, विजा आणि गारपीटीपासून संरक्षण होण्‍यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन राज्य शासनातर्फे करण्यात आलं आहे.

गेल्या दोन चार वर्षात अवेळी झालेल्या गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. त्यामुळे यावर्षी आधीच शेतकऱ्यांना खबरदारी घ्यावी  असं आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आलंय.  शेतमालाची योग्य प्रकारे साठवणूक केल्यास हे नुकसान टळू शकतं.

नागपूरच्या प्रादेशिक हवामान खात्याच्या तज्ज्ञांच्या अंदाजानुसार 10 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी गडचिरोली, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, नांदेड, लातूर जिल्ह्यांमध्ये तसेच अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यातील पूर्व भागात विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. पूर्व विदर्भामध्ये या दिवशी गारपीट होण्याची शक्यता अधिक आहे.

11 व 12 फेब्रुवारी रोजी या जिल्ह्यांमध्ये गडगडाटासह वादळी वारे वाहण्याची शक्यता असून गारपीट होण्याच्या शक्यतेसह या वाऱ्यांची तीव्रता अधिक असेल. विदर्भ आणि मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांमध्ये या दोन्ही दिवशी अधूनमधून वादळी वारे वाहण्याची व ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. 13 फेब्रुवारी रोजी वादळवाऱ्याची तीव्रता कमी होईल तर 14 फेब्रुवारीपासून हवामान सर्वसाधारण होण्याची शक्यता आहे. दरम्यान कापणीवर आलेल्या तुर, ज्वारीसारख्या पिकांची कापणी करुन धान्य योग्यरित्या साठवावं असं आवाहन करण्यात आलं आहे. शेतमालाच्या व्यापाऱ्यांनी देखील शेतमालाची संरक्षितपणे साठवणूक करण्याची सुचना करण्यात आली आहे. सर्व नागरिकांनी वादळी वारे, विजा आणि गारपीटीपासून स्वत:सह गुराढोरांचे संरक्षण होईल, याची दक्षता घ्यावी असा खबरदारीचा इशाराही राज्य सरकारकडून देण्यात आला आहे. ​

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 9, 2018 08:58 AM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close