S M L

विदर्भ, मराठवाड्यात येत्या 48 तासात वादळीवाऱ्यासह गारपिटीचा इशारा

विदर्भ, मराठवाड्यात येत्या 48 तासात वादळीवाऱ्यासह पुन्हा गारपीट होण्याचा इशारा हवामान खात्याने दिलाय.

Chandrakant Funde | Updated On: Feb 12, 2018 07:31 PM IST

विदर्भ, मराठवाड्यात येत्या 48 तासात वादळीवाऱ्यासह गारपिटीचा इशारा

12 फेब्रुवारी, मुंबई : विदर्भ, मराठवाड्यात येत्या 48 तासात वादळीवाऱ्यासह पुन्हा गारपीट होण्याचा इशारा हवामान खात्याने दिलाय. या पार्श्वभूमीवर या भागातील शेतकऱ्यांनी वेळीच योग्य ती दक्षता घेण्याचे आवाहन आपत्ती निवारण कक्षाने केले आहे. शेतकऱ्यांनी आपला शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा, तसंच बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी आणला असेल तो देखील वॉटरप्रूफ ताडपत्रीने व्यवस्थित छाकून ठेवावा, असंही आपत्ती निवारण कक्षाने स्पष्ट केलंय.

या वादळी वाऱ्यादरम्यान वीजेपासून आणि गारांपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, मोकळे मैदान, झाडाखाली, वीजवाहिनी अथवा ट्रॉन्सफॉर्मजवळ थांबू नये, अतिवृष्टीमुळे शेतीमालाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकरी बांधवांनी वेळीच नियोजन करावे, असंही आवाहन करण्यात आलंय. नागरिकांनी वादळी वारे, वीज आणि गारपीटीपासून स्वत:सह गुरा-ढोरांचे संरक्षण होईल याची दक्षता घ्यावी. असे आवाहन राज्य शासनामार्फत करण्यात आले आहे. कृषी विभाग आणि जिल्हा प्रशासनाने ही सर्व माहिती दूरध्वनी, व्हॉटसअप, एसएमएस किंवा इमेलद्वारे तातडीने शेतकरी बांधवांपर्यंत पोचण्याची व्यवस्था करावी, अशा सूचनाही आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिलेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 12, 2018 07:18 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

Live TV

News18 Lokmat
close