खडसेंवर 'दाऊद बाॅम्ब' टाकणाऱ्या मनीष भंगाळेला अटक

खडसेंवर 'दाऊद बाॅम्ब' टाकणाऱ्या मनीष भंगाळेला अटक

एकनाथ खडसे यांचे दाऊदशी संबंध असल्याचा आरोप करून खळबळ उडवून देणारा हॅकर मनीष भंगाळेला अटक करण्यात आली आहे.

  • Share this:

31 मार्च : राज्याचे माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचे दाऊदशी संबंध असल्याचा आरोप करून खळबळ उडवून देणारा हॅकर मनीष भंगाळेला अटक करण्यात आली आहे.

मुंबईच्या गुन्हे शाखेनं ही कारवाई केली आहे. मनीष भंगाळे या इथिकल हॅकर्सने दाऊदचे कॉल ट्रेस केल्याचा दावा केला होता. २०१४ ते २०१५ दरम्यान हॅकिंग करून दाऊदनं कुणा-कुणाला कॉल केले होते, याची माहिती त्यानं काढली होती.

दाऊदच्या कॉल लिस्टमध्ये त्याला मिळालेल्या एकूण १० चार मोबाईल क्रमांकांमध्ये एक नंबर खडसेंचा असल्याचं त्यानं म्हटलं होतं. पत्रकार परिषद घेऊन त्यानं खडसे आणि दाऊद यांच्या कथित कॉलची माहिती दिली होती. अन्य क्रमांकाची माहिती काढण्याची मागणी त्यानं पोलिसांकडे केली होती.

First published: March 31, 2017, 4:44 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading