Elec-widget

शपथविधीचं निमित्त, मोदी विरोधकांचं शक्तिप्रदर्शन

शपथविधीचं निमित्त, मोदी विरोधकांचं शक्तिप्रदर्शन

एच.डी कुमारस्वामी यांनी आज कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जी परमेश्वरा यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

  • Share this:

बंगळुरू,ता.23 मे: एच.डी कुमारस्वामी यांनी आज कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जी परमेश्वरा यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. कुमारस्वामी हे कर्नाटकचे 24 वे मुख्यमंत्री असतील.

कुमारस्वामी यांनी शपथ घेतल्यानंतर कर्नाटकमधल्या राजकीय नाट्याचा तिसरा अंक सुरू झालाय.

उद्या गुरूवारी कुमारस्वामी विधानसभेत आपलं बहुमत सिद्ध करणार आहेत. अजुनही काँग्रेस आणि जेडीएसच्या सर्व आमदारांना हॉटेल आणि रिसॉर्टमध्येच ठेवण्यात आलं आहे. उद्या बहुमत सिद्ध झाल्यानंतरच त्यांना मोकळं करण्यात येणार आहे.

त्याचबरोबर बहुमत सिद्ध झाल्यावरच कुमारस्वामी मंत्रिमंडळाचा विस्तार करणार असून काँग्रेसच्या वाट्याला 22 तर जेडीएसच्या वाट्याला 12 मंत्रिपदं येणार आहेत. शपथविधीच्या निमित्तानं भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्या विरोधात झाडून सर्व नेते बंगळुरात एकत्र आले होते.

Loading...

सोनिया गांधी, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, राष्ट्रवादीचे शरद पवार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममत बॅनर्जी, आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन, समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव, बसपाच्या सुप्रिमो मायावती, कम्युनिष्ट पक्षाचे डी.राजा आणि सीताराम येचुरी, लोक जनता दलाचे अजितसिंग, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.

उशीरा का होईना मात्र भाजपचा विजयाचा वारू कर्नाटकने रोखल्याने सर्व विरोधकांना आनंद झाल आहे. 2019 च्या लोकसभा निवडणूका जवळ आल्याने विरोधकांची ही एकजूट भाजपची काळजी वाढवणारी आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 23, 2018 06:54 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...