ज्यांच्या लग्नात डान्सिंग अंकल झाले प्रसिद्ध, त्याला भर रस्त्यात झाडल्या गोळ्या

ज्यांच्या लग्नात डान्सिंग अंकल झाले प्रसिद्ध, त्याला भर रस्त्यात झाडल्या गोळ्या

डान्सिंग अंकलच्या नावाने प्रसिद्ध झालेले विदिशाचे प्राध्यापक संजीव श्रीवास्तव हे ज्या मेव्हण्याच्या लग्नात नाचले आणि प्रसिद्ध झाले.

  • Share this:

16 जुलै : डान्सिंग अंकलच्या नावाने प्रसिद्ध झालेले विदिशाचे प्राध्यापक संजीव श्रीवास्तव हे ज्या मेव्हण्याच्या लग्नात नाचले आणि प्रसिद्ध झाले त्या मेव्हण्याला एका अज्ञाताने गोळी मारली आहे. कुशाग्रची परिस्थिती सध्या गंभीर आहे. त्याला सध्या स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

'डान्सिंग अंकल' अखेर गोविंदाला भेटले

ही घटना ग्वालियरच्या जनक गंज ठाणा परिसरातली आहे. या परिसरात डान्सिंग अंकलच्या यांच्या मेव्हण्याला भर रस्त्यात गोळ्या झाड्यात आल्या. या कुशाग्र घंभीर जखमी झाले आहेत. या थरार पाहणाऱ्या लोकांनी त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आणि चौकशीला सुरुवात केलीये. पोलीस सध्या आसपासच्या परिसरात लावलेल्या सीसीटीव्हींच्या आधारावर आरोपींचा शोध घेत आहेत. या अपघाताची माहिती मिळताच संजीव श्रीवास्तव हे ग्वालियरला दाखल झाले आहेत.

दरम्यान, काही दिवसांआधी डान्सिंग अंकल सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध झाले होते. त्यांनी अभिनेता गोविंदाच्या गाण्यावर डान्स करत चक्क गोविंदाला आपल्या तालावर नाचवलं आहे. बरं इतकंच नाही तर डान्सिंगचा स्टार हृतिक रोशनच्या गाण्यावरही त्यांनी डान्स केला होता.

गोविंदा आणि निलम यांच्या 'खुदगर्ज' चित्रपटातलं 'दिल बहलता है मेरा.. आपके आ जाने से' हे गाणं कोणे एके काळी प्रचंड गाजलं होतं. व्हायरल होणारा हा व्हिडिओ पाहून अनेक युजर्सना गोविंदाची आठवण झाल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा...

ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीतळावर 2 वारकऱ्यांचा शॉक लागून मृत्यू

'आम्ही कागदी वाघ नाही, मात्र...', नाव न घेता मुख्यमंत्र्यांची सेनेच्या नेत्यांवर टीका

Amazon Prime Sale: ग्राहकांसाठी पुढील 36 तास 'दिवाळी- दसरा'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 16, 2018 01:59 PM IST

ताज्या बातम्या