24 आॅक्टोबर : गुटखा किंग म्हणून नावलौकिक मिळवलेले माणिकचंद ब्रँडचे संस्थापक रसिकशेठ धारीवाल यांचं निधन झालंय. ते 78 वर्षांचे होते.
धारीवाल यांच्यावर पुण्यातील रूबी हाॅल रुग्णालयात उपचार सुरू होते. आज संध्याकाळी त्यांनी उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. प्रदीर्घ आजारामुळे धारीवाल यांच्या शरीरातील अवयव निकामी झाल्यामुळे त्यांचं निधन झालं. धारीवाल हे सुरुवातील तंबाखूचे व्यापारी होते. त्यानंतर त्यांनी गुटखा उद्योगाला सुरुवात केली. काही काळातच धारीवाल गुटखा किंग म्हणून ओळखले जाऊ लागले होते.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा