VIDEO : ...आणि ३ हजारांवर बंदुकांंवर त्यांनी चक्क असा बुलडोझर चालवला!

VIDEO :  ...आणि ३ हजारांवर बंदुकांंवर त्यांनी चक्क असा बुलडोझर चालवला!

प्लॅस्टिकच्या बाटल्या मशीनमध्ये क्रश केल्याचं ऐकलं असेल पण हजारो बंदुका आणि शस्त्रं अशी बुलडोझर चालवून नष्ट केल्याचं ऐकलंय कधी? मध्य प्रदेशातला हा व्हिडिओ पाहाच

  • Share this:

सागर(मध्य प्रदेश), १२ ऑक्टोबर :  आतापर्यंत तुम्ही प्लॅस्टिकच्या बाटल्या, धातूचे अनावश्यक भाग मशीननं क्रश केलेले पाहिले किंवा ऐकले असतील पण बंदुका, रिव्हॉल्वर, पिस्तुल अशी शस्त्र बुलडोझरनं चिरडलेली पाहिली आहेत का? मध्य प्रदेशातल्या एका पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या कारवायांमध्ये जप्त झालेल्या या शस्त्रांची अशी विल्हेवाट लावण्यात आली.

मध्ये प्रदेशातल्या सागर जिल्ह्यातल्या या पोलीस ठाण्यात ३ हजारांपेक्षा जास्त बंदुका, रिव्हॉल्वर, देशी कट्टा, पिस्तुल वगैरे शस्त्रं जमली होती. या शस्त्रांची विल्हेवाट लावण्यासाठी त्यावर चक्क बुलडोझर चालवण्यात आला आणि ही शस्त्र अशी चिरडून नंतर ११ फूट खोल खड्डा खणून त्यात पुरण्यात आली.

ही सगळी शस्त्रास्त्र कलेक्टोरेटच्या गोदामात गेली ३५ वर्षं ठेवून दिलेली होती. वेगवेगळ्या कारवाईत ही शस्त्र जप्त करण्यात आलेली होती. १९७५पासून २०१५ सालापर्यंत विविध ठिकाणहून जप्त केलेली ही शस्त्रास्त्र होती. या शस्त्रांचं काय करायचं याबबात कोर्टात केस सुरू होती. आता कोर्टाने दिलेल्या आदेशानंतर अशा प्रकारे बुलडोझर चालवत शस्त्रं नष्ट कऱण्यात आली.

या शस्त्रांबरोबरच काही जिवंत काडतुसंही कारवायांमध्ये जप्त करण्यात आलेली होती. ही काडतुसं वेगळी ठेवण्यात आली होती. ती बुलडोझरखाली न चिरडता तशीच खड्ड्यात पुरण्यात आली. जिवंत काडतुसांवर बुलडोझर घालतला असता तर मोठे स्फोट होण्याची शक्यता होती.

First published: October 12, 2018, 2:06 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading