मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

Maratha Reservation ला विरोध असणारे गुणरत्न सदावर्तेंनीही घेतली राज्यपालांची भेट; म्हणाले, राज्यपाल पोस्टमन नाहीत

Maratha Reservation ला विरोध असणारे गुणरत्न सदावर्तेंनीही घेतली राज्यपालांची भेट; म्हणाले, राज्यपाल पोस्टमन नाहीत

Gunratna Sadavarte Maratha Reservation राज्य सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय मान्य करावाच लागेल हे राज्यपालांना अवगत करून दिल्याचंही ते म्हणाले. शिष्टमंडळाकडून अशा भेटी घेणं आणि सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयावर असं वर्तन करणं चुकीचं आहे, असंही ते म्हणाले.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk

मुंबई, 13 मे : मराठा आरक्षणाला प्रखर विरोध असणारे वकील अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी गुरुवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. केंद्राकडं मराठा आरक्षणाबाबत कोणताही प्रस्ताव पाठवण्यापूर्वी दोन्ही बाजुंचं म्हणणं ऐकूण घ्यावं अशी विनंती त्यांनी राज्यपालांना केली. मराठा आरक्षणासाठी जिथं प्रयत्न होईल, तिथं याला विरोध करणार असल्याचं या भेटीनंतर गुणरत्न सदावर्ते यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं.

(वाचा-डिसेंबरपर्यंत संपूर्ण देशाला कोरोना लशीचं कवच; मोदी सरकारने तयार केला हा प्लॅन)

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात राज्य सरकारच्या मंत्र्यांच्या शिष्टमंडळानं भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. मराठा समाजाला आरक्षण देण्याचा अधिकार राष्ट्रपती किंवा केंद्राचा आहे. त्यामुळं मराठा समाजाच्या भावना पोहोचवाव्यात अशी विनंती शिष्टमंडळानं राज्यपालांकडे केली होती. याबाबत राष्ट्रपतींना पत्रही देण्यात आलं. या घडामोडींनंतर मराठा आरक्षणाला कायदेशीर विरोध करणारे अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनीही राज्यपालांची भेट घेत भूमिका मांडली.

मराठा नेत्यांचा दबाव...

राज्यपालांसोबत याविषयी प्रदीर्घ चर्चा झाल्याचं सदावर्ते यांनी सांगितलं. मराठा नेत्यांनी मुख्यमंत्र्यांवर दबाव आणून राज्यरपालांची भेट घेतल्याचा दावाही त्यांनी केला. राज्य सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय मान्य करावाच लागेल हे राज्यपालांना अवगत करून दिल्याचंही ते म्हणाले. शिष्टमंडळाकडून अशा भेटी घेणं आणि सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयावर असं वर्तन करणं चुकीचं आहे, असंही ते म्हणाले. राज्यातील मराठा नेते असंविधानिक मार्गाचा अवलंब करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

(वाचा-Cyclone Tauktae मुंबईसह, किनारपट्टी भागात जोरदार पावसाची शक्यता, 3 दिवस अलर्ट)

राज्यपाल पोस्टमन नाहीत...

मराठा समाजाला मागास ठरवण्याचा कोणताही प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यापूर्वी दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकून घ्यावे, अशी विनंती राज्यपालांना केल्याचंही सदावर्ते म्हणाले. राज्यपालांनी यावर विचार करण्याचं आश्वासन सदावर्ते यांना दिलं. दरम्यान इथे येऊन संदेश पोहोचवायला राज्यपाल हे काही पोस्टमन नाहीत आणि राजभवन म्हणजे काही टपाल कार्यालय नाही, असंही सदावर्ते म्हणाले.

जिथं जिथं गरज वाटेत तिथं मराठा आरक्षणाच्या विरोधात कायदेशीर लढाई लढणार असल्याचंही सदावर्ते म्हणाले. राज्यपालांच्या माध्यमातून आलेल्या अशा प्रकारच्या कोणत्याही प्रस्तावांचा विचार करू नये असं केंद्राला आवाहन केल्याचंही सदावर्ते म्हणाले. संभाजीराजे छत्रपती यांच्या वक्तव्यावर बोलताना, राजेशाही आता संपली आहे ते काय बोलतात ते त्यांच्यापुरतं मर्यादित आहे असं सदावर्ते म्हणाले. तर सुपरन्यूमररी ही बाब मराठ्यांच्या बाबतीत लागू होऊ शकत नाही, असा दावाही त्यांनी केला.

First published:

Tags: Governor bhagat singh, Maratha reservation