गुजरातमध्ये प्रथमच सर्व मतदान केंद्रांवर 'व्हीव्हीपॅट' मशीनचा वापर होणार

गुजरातमध्ये प्रथमच सर्व मतदान केंद्रांवर 'व्हीव्हीपॅट' मशीनचा वापर होणार

येत्या डिसेंबरमध्ये होऊ घातलेली गुजरातची विधानसभा निवडणूक अनेक अर्थाने वैशिष्ठ्यपूर्ण असणार आहे. या विधानसभा निवडणुकीत प्रथमच व्होटर व्हेरीफाईड पेपर ऑडिट ट्रेल अर्थात व्हीव्हीपॅट मशिनचा वापर करण्यात येणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 25 ऑक्टोबर : येत्या डिसेंबरमध्ये होऊ घातलेली गुजरातची विधानसभा निवडणूक अनेक अर्थाने वैशिष्ठ्यपूर्ण असणार आहे. या विधानसभा निवडणुकीत प्रथमच व्होटर व्हेरीफाईड पेपर ऑडिट ट्रेल अर्थात व्हीव्हीपॅट मशिनचा वापर करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे सर्व मतदान केंद्रांवर व्हीव्हीपॅट मशीन्सचा वापर केला जाणार आहे. यापूर्वी नांदेड महापालिका निवडणुकीत प्रायोगिक तत्वावर व्हीव्हीपॅट मशिन वापरण्यात आलं होतं. आपण केलेलं मतदान हे नेमकं कोणाच्या नावावर झालंय, हे या मशीनच्या माध्यमातून कळतं. कारण यापूर्वीच्या काही निवडणुकांमध्ये सत्ताधारी पक्षाने वोटिंग मशीनमध्ये घोटाळा केल्याचा आरोप झाला होता. तोच आरोप पुन्हा गुजरातमध्ये होऊ नये, म्हणून निवडणूक आयोगाने ही खबरदारी घेतलीय.

व्हीव्हीपॅट मशिन नेमकं कसं काम करतं ?

व्हीव्हीपॅट अर्थात व्होटर व्हेरीफाईड पेपर ऑडिट ट्रेल, या मशीनच्या माध्यमातून मतदार जेव्हा एखाद्या उमेदवाराला मतदान करण्यासाठी त्याच्या चिन्हापुढील बटण दाबतो, त्यावेळी व्हीव्हीपॅट मशिनवरील स्क्रीनवर ज्या उमेदवारच्या नावापुढील बटणही दाबले जाते, आणि लागलीच त्याचे नाव आणि चिन्हाची प्रिंटही निघते तसंच मतदारालाही मशीनच्या स्क्रीनवर काही सेकंद ही प्रिंट स्पष्टपणे दिसते आणि मग ही प्रिंट व्हीव्हीपॅट मशिनमधील डब्यात जाऊन पडते. अशा पद्धतीने संबंधीत मतदाराने कोणाला मतदान केले आणि ते मतदान नेमकं कुणाला झाले याचा पुरावाच या मशीनच्या माध्यमातून बघायला मिळतो.

शिवाय मशिनमधील आकडे आणि प्रिंटचे आकडे समान आल्यास, ईव्हीएममध्ये घोटाळा झाला नाही हेही सिद्ध होईल,असा आयोगाचा दावा आहे. पण या पद्धतीने मतमोजणी करण्याची मागणी झाली तर निकाल लांबण्याची शक्यता अधिक असते. कारण ईव्हीएम मधील मतं आणि व्हीव्हीपॅटमधील मतपत्रिका हे क्रॉसचेक कराव्या लागतील.

First published: October 25, 2017, 4:00 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading