गुजरातमध्ये प्रचाराच्या तोफा थंडावल्या, 'टेम्पल रण'मध्ये कोण जिंकणार ?

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गुजरातमधील प्रचाराचा तोफा आज अखेर थंडावल्या. येत्या 14 तारखेला दुसऱ्या टप्प्यासाठीचं मतदान होणार आहे. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी रोड शो करण्यास प्रशासनाने परवानगी नाकारल्याने मोदींनी साबरमती 'रिव्हर फ्रंट'वरून सी-प्लेन उडवून सकाळी चांगलीच हवा केली, या 'सी-प्लेन'मधूनच ते अंबिका देवीच्या दर्शनाला गेले. तर राहुल गांधींनी जगन्नाथ मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन गुजरातमध्ये यावेळी काँग्रेसच जिंकणार, असा दावा केला.

Chandrakant Funde | News18 Lokmat | Updated On: Dec 12, 2017 08:53 PM IST

गुजरातमध्ये प्रचाराच्या तोफा थंडावल्या, 'टेम्पल रण'मध्ये कोण जिंकणार ?

12 डिसेंबर, गांधीनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गुजरातमधील प्रचाराचा तोफा आज अखेर थंडावल्या. येत्या 14 तारखेला दुसऱ्या टप्प्यासाठीचं मतदान होणार आहे. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी रोड शो करण्यास प्रशासनाने परवानगी नाकारल्याने मोदींनी साबरमती 'रिव्हर फ्रंट'वरून सी-प्लेन उडवून सकाळी चांगलीच हवा केली, या 'सी-प्लेन'मधूनच ते अंबिका देवीच्या दर्शनाला गेले. तर राहुल गांधींनी जगन्नाथ मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन गुजरातमध्ये यावेळी काँग्रेसच जिंकणार, असा दावा केला.

 

गुजरातमधील प्रचारादरम्यान, राहुल गांधींनी भाजप सरकारला गेल्या 22 वर्षांमधील राज्य कारभाराबद्दल ट्विटरवरून 14 सवाल विचारले. तर मोदींनी प्रचार संपल्यानंतर लागोपाठ 7 ट्विट करून गुजरातमध्ये भाजपचीच सत्ता येणार असल्याचं म्हटलंय. या प्रचारादरम्यान, राहुल गांधींच्या बाजुने पाटीदार आंदोलनाचा नेता हार्दिक पटेल, ओबीसी नेता अल्पेश ठाकोर आणि दलित नेता जिग्नेश मेवानी या तीन युवा चेहऱ्यांनी भाजप सरकारविरोधात प्रचाराची जोरदार राळ उडवली. याउलट भाजपच्या प्रचारासाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच प्रचारात उतरावं लागलं. अर्थात अमित शहा त्यांच्या मदतीला होतेच. पण प्रचाराची सगळी धुरा स्वतः पंतप्रधानच वाहत होते.

गुजरातमध्ये त्यांनी तब्बल 28,119 किलोमीटरचा प्रवास करून 34 प्रचारसभा घेतल्या. तर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी 20,010 किलोमीटरचा प्रवास करून 54 प्रचारसभा घेतल्या. यावेळी राहुल गांधींनी गुजरातमध्ये तब्बल 14 हिंदु मंदिरांसमोर माथा टेकून प्रथमच 'स्वॉप्ट हिंदुत्वा'ची लाईन पकडल्याचं बघायला मिळालं. मोदींनी मात्र, संपूर्ण प्रचारादरम्यान गुजराती अस्मितेला हवा देण्याचा जोरदार प्रयत्न केला. याशिवाय राम मंदिर, राहुल गांधींचा धर्म कोणता ? पाकिस्तानशी लागेबांधे, काँग्रेसचा गुजरात द्वेष असे भावनिक मुद्दे प्रचारात आणून राहुल गांधींना कोंडीत पकडण्याची एकही संधी सोडली नाही. याउलट राहुल गांधी मात्र, शेवटपर्यंत भाजपला 22 वर्षांच्या सत्ता कारभाराचा हिशेब मागत राहिले. त्यामुळे दोन्ही बाजूनी प्रचारात चांगलीच रंगत निर्माण झाली.

अशातच काँग्रेसचे वाचाळवीर मणिशंकर अय्यर यांनी पंतप्रधानांबाबत 'नीच' वक्तव्य केल्यानं काँग्रेसची चांगलीच कोंडी झाल्याचं बघायला मिळालं कारण मोदींनी हा मुद्दा थेट गुजराती अस्मितेशी जोडला. म्हणून मग डॅमेज कंट्रोलसाठी राहुल गांधींना मणिशंकर अय्यर यांना तात्काळ काँग्रेसमधून निलंबित करावं लागलं. पण तोपर्यंत काँग्रेस प्रचाराच्या रणधुमाळीत बऱ्यापैकी बॅकफूटवर गेल्याचं जानवलं. त्यामुळे जर समजा उद्या गुजरातमध्ये पुन्हा भाजपच जिंकली तर त्यासाठी सर्वस्वी मणिशंकर अय्यर यांनाच जबाबदार धरलं जाईल. अर्थात हा सगळा राजकीय शक्यतांचा खेळ आहे. गुजरातमध्ये पहिल्या टप्प्यात 68 टक्के मतदान झालंय. गेल्या निवडणुकीतही इतकंच मतदान झालं होतं. त्यामुळे निकालाबाबत आत्ताच अंदाज बांधनं मोठं कठीण बनलंय. येत्या 14 तारखेला दुसऱ्या टप्प्याचं मतदान झाल्यानंतर 18 तारखेला अंतिम निकाल लागणार आहेत. तोपर्यंत सगळेच पक्ष गुजरातमधील विजयाचे दावे ठोकत राहतील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 12, 2017 08:47 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...