Home /News /news /

कोव्हिड सेंटरमध्ये भीषण आग, ICU मध्ये उपचार घेणाऱ्या 6 रुग्णाचा होरपळून मृत्यू

कोव्हिड सेंटरमध्ये भीषण आग, ICU मध्ये उपचार घेणाऱ्या 6 रुग्णाचा होरपळून मृत्यू

उदय शिवानंद रुग्णालयातील कोव्हिड सेंटरमध्ये 33 रुग्णांवर उपचार सुरू होते. त्यापैकी 11 रुग्णांना ICUमध्ये दाखल करण्यात आलं होतं.

    राजकोट, 27 नोव्हेंबर : कोरोनामुळे घरापासून लांब असतानाच मोठी दुर्घटना घडली आहे. कोरोनाचे उपचार घेत असलेला कोव्हिड सेंटरमध्ये भीषण आग लागली. या आगीत होरपळून 6 जणांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार कोव्हिड सेंटरमध्ये 33 जणांवर उपचार सुरू होते. त्यापैकी 11 जणांवर ICUमध्ये उपचार सुरू असताना तिथे आग लागली आणि या आगीत होरपळून 6 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ही धक्कादायक घटना गुजरातच्या राजकोट परिसरातील कोव्हिड सेंटरमध्ये घडल्यानं खळबळ उडाली आहे. राजकोट परिसरात उदय शिवानंद रुग्णालयातील ICUमध्ये ही आग लागल्याची माहिती मिळाली आहे. पालिका आयुक्त उदित अग्रवाल यांच्या म्हणण्यानुसार या प्रकरणांची माहिती मुख्यमंत्री विजय रुपाणी यांना देण्यात आली असून त्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. गेल्या काही महिन्यांत अहमदाबाद, जामनगर, वडोदरा आणि सूरत येथील कोव्हिड सेंटर असो किंवा रुग्णालयात आग लागल्याच्या घटना समोर आल्या आहेत. हे वाचा-धक्कादायक! रुग्णालयात कुत्रा कुरतडत राहिला मुलीचा मृतदेह; लोक VIDEO करण्यात दंग उदय शिवानंद रुग्णालयातील कोव्हिड सेंटरमध्ये 33 रुग्णांवर उपचार सुरू होते. त्यापैकी 11 रुग्णांना ICUमध्ये दाखल करण्यात आलं होतं. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती मिळाली आहे. आयसीयूमध्ये उपचार घेत असलेल्या 11 पैकी 5 रुग्णांचा आगीमुळे मृत्यू झाला आहे.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Gujrat

    पुढील बातम्या