गुजरातचा अंतिम निकाल जाहीर ; भाजप 'नर्व्हस 99'मध्येच अडकली !

गुजरातचा अंतिम निकाल जाहीर ; भाजप 'नर्व्हस 99'मध्येच अडकली !

गुजरात विधानसभेच्या सर्वच्या सर्व म्हणजेच 182 जागांचे निकाल निवडणूक आयोगाने जाहीर केलेत. भाजप 99 जागांसह सलग पाचव्यांदा सत्तेत आलं असलं तरी भाजपला जागांची शंभरी पार करता आलेली नाही, याउलट राहुल गांधींच्या नेतृत्वात काँग्रेसने मोदी - शहांचं होम ग्राऊंड असलेल्या गुजरातमध्ये पहिल्यांदाच 77 जागा जिंकत प्रथमच जोरदार टक्कर दिलीय.

  • Share this:

18 डिसेंबर, नवी दिल्ली : गुजरात विधानसभेच्या सर्वच्या सर्व म्हणजेच 182 जागांचे निकाल निवडणूक आयोगाने जाहीर केलेत. भाजप 99 जागांसह सलग पाचव्यांदा सत्तेत आलं असलं तरी भाजपला जागांची शंभरी पार करता आलेली नाही, याउलट राहुल गांधींच्या नेतृत्वात काँग्रेसने मोदी - शहांचं होम ग्राऊंड असलेल्या गुजरातमध्ये पहिल्यांदाच 77 जागा जिंकत प्रथमच जोरदार टक्कर दिलीय. भारतीय ट्रायबल पार्टीला 02 तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 01 जागा मिळालीय. तीन जागांवर अपक्ष निवडून आलेत. त्यापैकी युवा दलित नेते जिग्नेश मेवाणी अपक्ष म्हणून निवडून आले असले तरी त्यांना काँग्रेसने पाठिंबा दिला होता.

पंतप्रधान मोदींनी या विजयाचं श्रेय गुजराती जनतेला देताना सबका साथ सबका विकास हाच आपला विजयाचा मंत्र असल्याचं म्हटलंय. राहुल गांधींनी गुजरातच्या निकालांवर आपण संतुष्ट असून नाराज नसल्याचं म्हटलंय. तर अमित शहांनी विरोधकांच्या जातीयवादी प्रचारामुळेच आम्हाला 150चं टार्गेट गाठता आलं नसल्याचं म्हटलंय. गुजरातच्या निवडणुकीत भाजपला 49.01 टक्के मतं मिळालीत. तर काँग्रेसला 41.40 टक्के मतं मिळालीत. गुजरातच्या निवडणुकीत 'नोटा'ला तब्बल 1.8% टक्के म्हणजेच 5 लाख 51हजार 615 मतं मिळालीत. याचाही राजकीय पक्षांनी गांभिर्याने विचार करण्याची गरज आहे.

एकूण सारांश कायतर गुजरातचा निकाल भाजपसाठी अगदीच 'हायसं' वाटणारा असला तरी काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी अगदीच निराश करणारा नाहीये. किंबहुना नव्यानेच काँग्रेसचं अध्यक्षपद स्वीकारलेल्या राहुल गांधींसाठी गुजरातमधील वाढलेला मतांचा टक्का आणि वाढीव जागा या नक्कीच  नवी उभारी देणाऱ्या आहेत. याचाच अर्थ 2019ची सेमी फायनल म्हणून पाहिल्या गेलेल्या गुजरात निवडणुकीने भाजपसाठी आगामी लोकसभा निवडणूक मोदींसाठी ही काही अगदीच एकतर्फी असणार नाही, याचेच स्पष्ट संकेत दिलेत.

गुजरात विधानसभा निवडणूक 2017 निकाल

भाजप - 99

काँग्रेस - 77

भारतीय ट्रायबल पार्टी -02

राष्ट्रवादी काँग्रेस-01

इतर - 03

---------------------

एकूण जागा- 182

मतांची टक्केवारी

भाजप- 49.1टक्के

काँग्रेस-41.4टक्के

इतर - 4.3 टक्के

भारतीय ट्रायबल पार्टी- 0.7 टक्के

राष्ट्रवादी काँग्रेस- 0.6 टक्के

नोटा-1.8टक्के( अंदाजे 5.5लाख मते)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 18, 2017 09:44 PM IST

ताज्या बातम्या