गुजरात निवडणुकीवर तब्बल 1 हजार कोटींचा सट्टा !, सट्टेवाल्यांची पहिली पसंती भाजपलाच !

गुजरात निवडणुकीवर तब्बल 1 हजार कोटींचा सट्टा !, सट्टेवाल्यांची पहिली पसंती भाजपलाच !

सट्टेबाजारात सध्या भाजपचा भाव वधारला असून गुजरात निवडणुकीवर तब्बल एक हजार कोटींचा सट्टा लागल्याचं बोललं जातंय.

  • Share this:

28 नोव्हेंबर, गांधीनगर : क्रिकेट असो किंवा निवडणूक... सर्वात जास्त पैसा लागतो तो सट्ट्यावरच... गुजरात निवडणूक तर आता या सट्टेबाजांसाठी हॉट केक आहे. कारण संपूर्ण देशाचं लक्ष या निवडणूकांवर केंद्रीत झालंय. भाजप आणि काँग्रेस दोघांसाठीही ही महत्वाची लढाई आहे. निवडणूकांचं चित्र जसं बदलतंय, तशी सट्टेबाजाराच्या आकड्यांमध्ये चढउतार होतोय. सट्टेबाजारात सध्या भाजपचा भाव वधारला असून गुजरात निवडणुकीवर तब्बल एक हजार कोटींचा सट्टा लागल्याचं बोललं जातंय.

गुजरात निवडणुकीची सर्व सूत्र मोदींनी हाती घेतल्यापासून भाजपचा विजय जवळपास नक्की झालाय, असं सट्टेबाजांचा अंदाज आहे. पण 2012 पेक्षा भाजपला कमी जागा मिळतील, असंही सट्टेबाजांना वाटतंय. यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसला 60 ते 80 जागा मिळतील असा अंदाज आहे. त्यामुळे सट्टेबाजाराचा कल भाजपकडं आहे. भाजपच्या प्रत्येक जागेसाठी एक रुपयाला सव्वा रुपयांचा भाव आहे. काँग्रेसला एक रुपयासाठी 3 रुपये तर आपच्या प्रत्येक जागेसाठी एक रुपयाला 10 रुपये असा भाव आहे. शिवसेनेच्या एका जागेसाठी तब्बल 25 रुपयांचा आणि राष्ट्रवादीच्या एका जागेसाठी रूपयाला तब्बल 30 रुपयांचा भाव आहे. सट्टेबाजारात ज्या पक्षावर सर्वात कमी भाव त्या पक्षाला सर्वात जास्त पसंती अशी मान्यता आहे. त्यामुळं भाजप जरी सट्टेबाजारात पसंतीचा पक्ष असला तरी 18 डिसेंबरच्या निकालांनंतर कोणत्या पक्षासोबत कोणत्या सट्टेबाजांचं दिवाळं वाजणार हे स्पष्ट होणार आहे.

गुजरात निवडणुकीवर सट्टा

गुजरात निवडणुकीवर तब्बल 1 हजार कोटींचा सट्टा

भाजप पुन्हा सत्तेवर येईल असा सट्टेबाजांचा अंदाज

2012 पेक्षा भाजपला कमी जागा मिळतील असा अंदाज

काँग्रेसला 60 ते 80 जागा मिळतील असा अंदाज

काय आहे सट्टेबाजाराचा कल ?

भाजपच्या प्रत्येक जागेसाठी 1 रुपयाला 1.25 पैसे

काँग्रेसच्या प्रत्येक जागेसाठी 1 रुपयाला 3 रुपये

आपच्या प्रत्येक जागेसाठी 1 रुपयाला 10 रुपये

शिवसेनेच्या प्रत्येक जागेसाठी 1 रुपयाला 25 रुपये

राष्ट्रवादीच्या प्रत्येक जागेसाठी 1 रुपयाला 30 रुपये

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 28, 2017 07:33 PM IST

ताज्या बातम्या