गुजरात निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी ६८ टक्के मतदान

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी 89 जागांसाठी मतदान पार पडलं. पहिल्या टप्प्यातील 89 जागांसाठी 977 उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद झालंय.

Chandrakant Funde | News18 Lokmat | Updated On: Dec 9, 2017 06:55 PM IST

गुजरात निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी ६८ टक्के मतदान

09 डिसेंबर, सुरत : गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठीआज मतदान संपलं. पहिल्या टप्प्यात 68 टक्के मतदान झालंय. मागील निवडणुकीत 68 टक्के मतदानाची नोंद झाली होती. यावेळीही तितक्याच  मतदानाची नोंद झालीये. त्यामुळे सत्ताधारी भाजपला हा दिलासा मानला जातोय.

गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी आज सकाळी आठ वाजल्यापासून उत्साहात मतदानाला सुरूवात झालीय. पहिल्या दोन तासांत 31 टक्के मतदान झालं होतं. त्यानंतर दुपारी 2 वाजेपर्यंत 46 टक्के मतदान झालंय. पहिल्या टप्प्यात 89 जागांसाठी शांततेत मतदान पार पडलं. 89 जागांसाठी 977 उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद झालंय. एकूण 19 जिल्ह्यांमध्ये हे मतदान झालं असून यामध्ये कच्छच्या 6, सौराष्ट्रच्या 48 आणि दक्षिण गुजरातच्या सात जागांचा समावेश आहे.

यंदाची गुजरातची विधानसभा निवडणूक अतिशय चुरशीची होणार असा अंदाज आहे. काँग्रेसकडून राहुल गांधी संपूर्ण ताकदिनिशी या निवडणुकीत उतरल्याने पंतप्रधान मोदींसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनलीय. दरम्यान, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी आपल्या राजकोट पश्चिम मतदारसंघात मतदानाचा हक्क बजावला. दरम्यान, गुजरातमध्येही अनेक ठिकाणांहून मतदान यादीतून काही जणांची नावं गायब झाल्याच्या तक्रारीही आल्या आहेत.

 

 

Loading...

 

गुजरातची रणधुमाळी - पहिला टप्पा

पहिल्या टप्प्यासाठी मतदान- ९ डिसें.२०१७

१८२ जागांपैकी ८९ जागांसाठी मतदान

पहिल्या टप्प्यात ९७७ उमेदवार

१९ जिल्ह्यांमध्ये मतदान

कच्छ- ६

सौराष्ट्र- ४८

दक्षिण गुजरात-७

पहिल्या टप्प्यात २ कोटी १२ लाख मतदार

 

 

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 9, 2017 05:15 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...