राहुल गांधींना 'पप्पू ' म्हणून संबोधण्यास निवडणूक आयोगाची बंदी

गेल्या लोकसभेत सोशल मीडियाद्वारे राहुल गांधींना पप्पू असं हिणवून केंद्रात सत्तेवर आलेल्या भाजपला गुजरात निवडणुकीत मात्र, तसं करता येणार नाहीये. भाजपच्या जाहिरातींमध्ये वापरण्यात आलेल्या 'पप्पू' या शब्दावर गुजरात निवडणूक आयोगाने बंदी घातलीय.

Chandrakant Funde | News18 Lokmat | Updated On: Nov 15, 2017 11:23 PM IST

राहुल गांधींना 'पप्पू ' म्हणून संबोधण्यास निवडणूक आयोगाची बंदी

15 नोव्हेंबर, गांधीनगर : गेल्या लोकसभेत सोशल मीडियाद्वारे राहुल गांधींना पप्पू असं हिणवून केंद्रात सत्तेवर आलेल्या भाजपला गुजरात निवडणुकीत मात्र, तसं करता येणार नाहीये. भाजपच्या जाहिरातींमध्ये वापरण्यात आलेल्या 'पप्पू' या शब्दावर गुजरात निवडणूक आयोगाने बंदी घातलीय.

गुजरात निवडणुकीदरम्यान, भाजपने टीव्ही जाहिरातींमधून राहुल गांधींसाठी 'पप्पू' असा शब्दप्रयोग वापरला होता. पण निवडणूक आयोगाच्या मीडिया कमिटीने त्याला आक्षेप घेतल्याने निवडणूक आयोगाने त्यावर बंदी घातलीय. राहुल गांधींसाठी पप्पू हा शब्दप्रयोग करणं हे अपमानजणक असल्याचं निवडणूक आयोगाने म्हटलंय. त्यामुळे भाजपला यापुढे कुठेही किमान 'ऑनरेकॉर्ड' तरी पप्पू म्हणून हिनवता येणार नाहीये.

दरम्यान, भाजपने मात्र, जाहिरातीमध्ये वापरण्यात आलेला 'पप्पू' हा शब्द कुठल्याही व्यक्तीसाठी नव्हता, असा दावा केलाय. पण तरीही आयोगाचा आक्षेप असेल आम्ही यापुढच्या जाहिरातींमध्ये 'पप्पू' हा शब्दप्रयोग वापरणार नाही, असा खुलासा केलाय.

सोशल मीडियामधून आजही भाजप समर्थकांकडून राहुल गांधींसाठी आजही सर्रासपणे पप्पू हा शब्दप्रयोग वापरला जातो. त्यामुळे सोशल मीडियातील शब्दप्रयोगावर निवडणूक नेमकी कशी बंदी आणणार हा प्रश्नच आहे कारण सोशल मीडियातून राजकीय नेत्यांवर होणाऱ्या गलिच्छ भाषेतील 'जोक्स'वर अजूनही कोणीच बंदी आणू शकलेलं नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 15, 2017 11:23 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...