Home /News /news /

ज्वेलर्स मालकाच्या मुलीच्या धाडसापुढे दरोडेखोरांना फुटला घाम, चोरीचा फसला डाव

ज्वेलर्स मालकाच्या मुलीच्या धाडसापुढे दरोडेखोरांना फुटला घाम, चोरीचा फसला डाव

व्यावसायिकाच्या मुलीने प्रसंगावधान राखून सायरन वाजवला आणि स्वत:च्या जिवाची पर्वा न करता तिने तत्काळ 100 क्रमांकावर पोलिसांना (Police) घटना कळवून तिन्ही लुटारूंना पकडून देण्याचे धाडसाचे काम केले.

सुरत, 28 मे: गुजरातच्या सुरत (Surat) शहरातलं एक सराफा दुकान लुटण्याचा डाव सराफा व्यावसायिकाच्या मुलीने (Jwellers) दाखवलेल्या धाडसामुळे फसल्याची घटना नुकतीच घडली. सुरतमधल्या डिंडोली परिसरात तीन लुटारू दागिने लुटण्यासाठी दुकानात घुसले; पण व्यावसायिकाच्या मुलीने प्रसंगावधान राखून सायरन वाजवला आणि स्वत:च्या जिवाची पर्वा न करता तिने तत्काळ 100 क्रमांकावर पोलिसांना (Police) घटना कळवून तिन्ही लुटारूंना पकडून देण्याचे धाडसाचे काम केले. यात एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे ‘आज तक’ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे. सुरतमधल्या डिंडोली खरवासा रस्त्यावर रंगीला पार्क सोसायटीच्या समोर कोठारी ज्वेलर्स नावाचं दुकान आहे. सोन्याची अंगठी घेण्याचा बहाणा करत तिघे जण या दुकानात घुसले. त्यांच्याजवळ काही हत्यारंही लपवलेली होती. जवळपास अर्धा तास त्यांनी अंगठ्यांची वेगवेगळी डिझाइन्स पाहिली. सराफा व्यावसायिकाची मुलगी ज्योती इंद्रसेन जैन त्यांना अंगठ्या दाखवत होती. त्यानंतर ज्योतीला धमकावत त्यांनी लूटमार (Robbery) सुरू केली. तिघांपैकी दोघा जणांनी उड्या मारून काउंटरच्या आतमध्ये प्रवेश केला. मिळेल ते दागिने घेण्यास त्यांनी सुरुवात करताच ज्योतीने न घाबरता इमर्जन्सी सायरन (Emergency Siren) वाजवला. सायरनचा आवाज ऐकून लुटारूंची तारांबळ उडाली. ते दुकानातून पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले. एक लुटारू दुकानातल्या शोकेसमध्ये लटकवलेलं मंगळसूत्र घेऊन पळून गेला. त्याची किंमत 1 लाख 37 हजार रुपये होती. लुटारू पळून गेल्यानंतर ज्योतीने तत्काळ 100 क्रमांक डायल करून पोलिसांना घटनेची माहिती दिली. एका खोलीत तडजोडीची चर्चा, दुसऱ्या खोलीत बलात्कार पीडितेनं घेतला मोठा निर्णय डिंडोली ठाण्याचे निरीक्षक जे.एन. झाला आणि त्यांचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनेचा आढावा घेऊन परिसरातल्या सीसीटीव्ही फुटेजच्या (CCTV Footage) आधारावर लुटारूंचा शोध सुरू केला. काही तासांतच पोलिसांनी तिन्ही आरोपींना पकडलं. यात रोहन सुरेश खटीक, जयदीप निकुंभेसह एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. सराफा व्यापाऱ्याची मुलगी ज्योतीने दाखवलेल्या धाडसाचं सर्वत्र कौतुक होत असून, सोशल मीडियावरही याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. तिघे एकाच वाहनावरून आले दागिन्यांचं दुकान लुटणारे तिघेही सुरतच्या गोडादरा परिसरातले रहिवासी आहेत. सराफा दुकान लुटण्यासाठी तिघेही एकाच वाहनावरून आल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आलं आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दुचाकीचा क्रमांक दिसल्याने पोलिसांना त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी जास्त वेळ लागला नाही. कोठारी ज्वेलर्समध्ये लूटमार करणाऱ्या आरोपींचं रेकॉर्ड तपासलं जात असून, त्यांच्यावर यापूर्वी काही गुन्हे दाखल आहेत का, याची माहिती काढली जात असल्याचं सुरतचे पोलिस उपायुक्त सज्जन सिंह परमार यांनी सांगितलं.
Published by:Pooja Vichare
First published:

Tags: Gujrat

पुढील बातम्या