तुम्हीही लढू शकतात गुजरातची निवडणूक, मिळू शकतं आॅनलाईन तिकीट !

तुम्हीही लढू शकतात गुजरातची निवडणूक, मिळू शकतं आॅनलाईन तिकीट !

जर तुम्हाला गुजरात विधानसभा निवडणुकीत स्वत:चं नशिब आजमावून पाहायचं असेल तर एक पार्टी तुम्हाला उमेदवारी देण्यासाठी तयार आहे.

  • Share this:

16 नोव्हेंबर : जर तुम्हाला गुजरात विधानसभा निवडणुकीत स्वत:चं नशिब आजमावून पाहायचं असेल तर एक पार्टी तुम्हाला उमेदवारी देण्यासाठी तयार आहे. होय, गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकर सिंह वाघेला यांचा जनविकल्प मोर्चा या पक्षाने उमेदवारी देण्याचा निर्णय जाहीर केलाय. आणि तुम्हाला पक्षाकडून आॅनलाईन तिकीट मिळणार आहे.

गुजरात निवडणुकीच्या आखाड्यात प्रचाराचा धुराळा उडालाय. पण त्याही पलीकडे सोशल मीडिया, थ्रीडी कॅम्पेन जोरात सुरू आहे. वाघेला यांच्यापक्षाने एक पाऊल पुढे टाकत थेट आॅनलाईन तिकीट देण्यास सुरुवात केलीये. त्यामुळे तुम्हाला कोणत्याही  राजकीय पक्षाची ओळख गरजेची नाहीये. तसंच तिकीटासाठी पैसेही द्यायची गरज नाहीये.

वाघेला यांच्या पक्षाने इच्छुक उमेदवारांना तिकीट देण्यासाठी आॅनलाईन शक्कल लढवली आहे. आतापर्यंत तब्बल 350 हुन अधिक लोकांनी यासाठी अर्ज भरला आहे. यात तरुण मुलं आणि महिलांचा समावेश आहे. या सर्वांना उमेदवारी देण्याचा निर्णय यांच्या क्षमतेवर पक्ष घेणार आहे.

जनविकल्प मोर्चाने उमेदवारांना तीन पानांचा एक अर्ज दिलाय तो डाऊनलोड करून अपलोड करायचा आहे. पण, हा अर्ज भरण्यासाठी सर्व अटी शर्थी पूर्ण कराव्या लागणार आहे. जर तुम्ही सर्व अटींसह अर्ज भरला तर थेट पक्षाचं सदस्यत्व मिळणार आहे.

त्यानंतर तुम्हाला एक एसएमएस येईल त्यात तुम्हाला कुठे आणि कधी यायचं. आतापर्यंत 350 अर्ज आले आहे यापैकी 180 जणांना मुलाखतीसाठी बोलवण्यात आलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 16, 2017 11:55 PM IST

ताज्या बातम्या