कोरोनाचा पुन्हा उद्रेक, शाळा सुरू करण्याचा निर्णय या राज्याने घेतला मागे

शाळा सुरू करण्यास परवानगी देण्यात आल्यानंतर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विशेष नियमावलीही जारी करण्यात आली आहे. या नियमांचं पालन करणं शाळांसाठी बंधनकारक असणार आहे.

दिवाळीची गर्दी आणि नागरिकांचा निष्काळजीपणा यामुळे पुन्हा कोरोनाने डोकं वर काढल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

  • Share this:
    गांधीनगर 19 नोव्हेंबर: कोरोनाचा पुन्हा उद्रेक झाल्याने गुजरात सरकारने (Gujrat Government) शाळा सुरू करण्याचा निर्णय मागे घेतला आहे. 23 नोव्हेंबरपासून शाळा सुरू होणार होत्या. मात्र रुग्ण संख्या वाढत असल्याने सरकारने हा निर्णय मागे घेतला आहे. आता परिस्थिती पाहून निर्णय घेण्यात येणार असल्याचं सरकारने म्हटलं आहे. मार्च महिन्यापासून राज्यातली शाळा कॉलेजेस बंद असून Online अभ्यास सुरू आहे. दिवाळीची गर्दी आणि नागरिकांचा निष्काळजीपणा यामुळे पुन्हा कोरोनाने डोकं वर काढल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हरियाणामध्ये शाळा सुरू झाल्यानंतर 80 पेक्षा जास्त मुलांना कोरोनाची लागण झाली होती. दरम्यान,  कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी गुजरातमधल्या अहमदाबाद (Ahmadabad city) प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. शुक्रवारपासून शहरात रात्री कर्फ्यू लागू केला जाणार आहे. रात्री 9 पासून ते सकाळी 6 वाजेपर्यंत हा कर्फ्यू असणार आहे. तर कोरोनाचा(Covid-19) मुकाबला करण्यासाठी 300 डॉक्टर्स आणि मेडिकलच्या 300 विद्यार्थ्यांना सज्ज राहण्यास सांगण्यात आलं आहे. त्याच बरोबर 20 रुग्णवाहिका तयार ठेवण्यात आल्या आहेत. शहरातल्या सरकारी आणि खासगी हॉस्पिटल्समधले बेड्स वाढविण्यात आले आहेत. शहरात सध्या 2600 बेड्स खाली आहेत. लोकांनी नियमांचं सक्तीने पालन करावं असं आवाहन प्रशासनाने केलं आहे. पुढच्या आदेशापर्यंत हा कर्फ्यू कायम राहणार असल्याचंही प्रशासनाने म्हटलं आहे. अहमदाबाद हे शहर कोरोनाचं हॉटस्पॉट झालं होतं. दिवाळीची गर्दी ओसरल्यानंतर आता रुग्णांची संख्या वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे.  
    Published by:Ajay Kautikwar
    First published: