'पाकिस्तानातून माझ्या पतीचा मृतदेह आणून द्या', हतबल पत्नीची मोदी सरकारकडे मागणी

'पाकिस्तानातून माझ्या पतीचा मृतदेह आणून द्या', हतबल पत्नीची मोदी सरकारकडे मागणी

  • Share this:

अहमदाबाद, 9 एप्रिल : 'पाकिस्तानातल्या कारागृहात मृत्यू झालेल्या माझ्या पतीचा मृतदेह ताब्यात द्यावा', अशी मागणी गुजरातमधल्या एका मच्छिमाराच्या पत्नीनं केंद्र सरकारकडे केली आहे. या महिलेनं तिच्या पतीचं पार्थिव पाकिस्तानातून भारतात आणण्याची प्रक्रिया जलदगतीनं करण्यात यावी, अशी मागणी परराष्ट्र मंत्रालयाकडे केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या महिलेच्या पतीचा गेल्या महिन्यात पाकिस्तानातील कारागृहात मृत्यू झाला. भिखाभाई बामनिया असं मृत्यू झालेल्या मच्छिमाराचं नाव आहे. पाकिस्तानच्या हद्दीत शिरल्यानं त्यांच्या नौदलानं 15 नोव्हेंबर 2017रोजी मामनिया यांना ताब्यात घेतलं होतं.

बामनिया हे गिर सोमनाथ जिल्ह्यातील उना येथील पालदी गावातील रहिवासी होते. त्यांच्या पत्नी भानीबेन यांनी म्हटलं आहे की, 'माझ्या पतीचं 4 मार्चला पाकिस्तानच्या कारागृहात निधन झाल्याची माहिती मिळाली. त्याचं निधन होऊन आता एक महिन्याहून अधिक काळ लोटला आहे. पण अद्यापपर्यंत पतीचं पार्थिव भारतात पाठवण्यात आलेलं नाही.'

परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी कित्येक भारतीयांची मदत केली आहे. त्यामुळे या प्रकरणातही स्वराज यांनी वैयक्तिक पातळीवर हस्तक्षेप करावा. जेणेकरून माझ्या पतीचं पार्थिव भारतात लवकरात लवकर आणण्यास मदत होईल, अशी अपेक्षा भानीबेन यांनी व्यक्त केली आहे.

वाचा अन्य बातम्या

सोलापुरातील भाजप उमेदवाराची सभा, युवकाने गावातील समस्या सांगताच उडाला गोंधळ

कमलनाथांच्या निकटवर्तीयांवर कारवाई : युद्धात व निवडणुकांत सगळे गुन्हे माफ-उद्धव ठाकरे

भाजपच्या जाहीरनाम्यात महिलांबाबत गंभीर चूक, काँग्रेसचा खुलासा

VIDEO : अजितदादांना आवडलं राज ठाकरेंचं भाषण, विनोद तावडेंचा केला 'पोपट'

First published: April 9, 2019, 7:59 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading