गुजरातमध्ये जिथे झाला जीएसटीला विरोध, तिथेच भाजपने जिंकल्यात 16 पैकी 15 जागा !

गुजरातमध्ये जिथे झाला जीएसटीला विरोध, तिथेच भाजपने जिंकल्यात 16 पैकी 15 जागा !

पण ज्या भागात जीएसटीला कडाडून विरोध झाला त्या सूरत मतदारसंघात भाजपने 16 पैकी 15 जागांवर विजय मिळवलाय.

  • Share this:

18 डिसेंबर : गुजरात विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा मुद्दा होता जीएसटीचा..जीएसटीच्या विरोधात गुजरातमधील व्यापारीही रस्त्यावर उतरले होते. पण ज्या भागात जीएसटीला कडाडून विरोध झाला त्या सूरत मतदारसंघात भाजपने 16 पैकी 15 जागांवर विजय मिळवलाय.

सूरतमध्ये जीएसटीच्या विरोधात व्यापाऱ्यांनी आंदोलन केलं होतं. त्यामुळे गुजरात निवडणुकीत जीएसटीचा मुद्दा मोठा झाला. विरोधकांनी हा मुद्दा प्रचारात ऐरणीवर आणलाय. काँग्रेससह इतर पक्षांनी जीएसटीच्या मुद्यावरून भाजप सरकारवर टीका केली होती.

जीएसटी लागू झाल्यानंतर सूरतमधील जवळपास 40 हजार कपडा व्यापारी 1 जुलैपासून संपावर गेले होते. व्यापारांनी शहरात मानवी साखळी करून निषेध व्यक्त केला होता.

व्यापाऱ्यांचा आंदोलनाचा निवडणुकीवर परिणाम होईल अशी शक्यता होती पण इथल्या मतदारांनी भाजपला साथ दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 18, 2017 04:52 PM IST

ताज्या बातम्या