भाजप आणि राष्ट्रवादीच्या 2 नेत्यांमध्ये जुंपली, समोर येण्याचं खुल्लं आवाहन

भाजप आणि राष्ट्रवादीच्या 2 नेत्यांमध्ये जुंपली, समोर येण्याचं खुल्लं आवाहन

रोहित पवारांच्या या टीकेला आता नगरचे पालकमंत्री राम शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

  • Share this:

सोलापूर, 27 ऑगस्ट :  गावात विकास केल्याचे त्यांना बॅनर लावून सांगण्याची वेळ आली असल्याने जमखेडचे लोकप्रतिनिधी हे बॅनर मंत्री असल्याची तिखट टीका राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार यांनी केली होती. रोहित पवारांच्या या टीकेला आता नगरचे पालकमंत्री राम शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. माझं काम नसेल तर त्यांनी काय केलं हे दाखवावं. माझं त्यांना आवाहन आहे, असं राम शिंदे म्हणाले आहेत. त्यामुळे आता राम शिंदे आणि रोहित पवार यांच्यात वाकयुद्ध सुरू झालं आहे.

गेली दहा वर्षे लोकप्रतिनिधी असलेले राम शिंदे हे सध्या गावागावात विकास केल्याचे बॅनर लावत आहेत. पण केलेली कामं नागरिकांना दिसत नाहीत असं रोहित पवार म्हणाले होते. पण केलेल्या कामाचे बॅनर लावणं गैर नाही असं प्रत्युत्तर राम शिंदे यांनी दिलं आहे. 288 आमदारांपैकी सर्वाधिक काम मी केली असतील असंही राम शिंदे म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या शिवस्वराज्य यात्रेनिमित्ताने जामखेड बाजारतळावर आयोजित जाहीर सभेत बोलताना रोहित पवार यांनी ही टीका केली आहे. रोहित पवार हेच आता कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातील उमेदवार असल्याचं सध्या स्पष्ट झालं आहे. याची स्पृष्टी सभेस उपस्थित असलेले प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. रोहित पवार हेच कर्जत-जमखेडचे पुढचे आमदार असतील असे जाहीर वक्तव्य त्यांनी केलं आहे.

इतर बातम्या - खळबळजनक! रस्त्यात तरुणीवर धारदार शस्त्राने हल्ला; चेहरा, पाठीवर केले सपासप वार

सभेत खासदार अमोल कोल्हे, राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, पक्षप्रवक्ते अंकुश काकडे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब खान आदी उपस्थित होते. याच मतदारसंघातून उमेदवारी मागत असलेल्या महिला जिल्हाध्यक्षा मंजुषा गुंड मात्र सभेस अनुपस्थित होत्या. जामखेडमधे एकाच दिवशी मुख्यमंत्री फडणवीस यांची महाजनांदेश यात्रा आणि राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा आलेल्या असताना या सभांना मोठ्या गर्दीची तजवीज दोन्ही बाजूंनी केल्याचं दिसून आलं.

'छोरा मुंबई किनारेवाला', आदित्य ठाकरेंबद्दलचा हा SPECIAL REPORT

Published by: Renuka Dhaybar
First published: August 27, 2019, 8:05 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading