जीएसटीची अंमलबजावणी पुढच्या वर्षापासून करा, हायकोर्टात याचिका दाखल

जीएसटीची अंमलबजावणी १ जुलैपासून न करता पुढील वर्षी १ एप्रिलपासून करण्यात यावी अशी मागणी करणारी याचिका मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jun 28, 2017 12:29 AM IST

जीएसटीची अंमलबजावणी पुढच्या वर्षापासून करा, हायकोर्टात याचिका दाखल

विवेक कुलकर्णी,मुंबई

27 जून : जीएसटीची अंमलबजावणी १ जुलैपासून न करता पुढील वर्षी १ एप्रिलपासून करण्यात यावी अशी मागणी करणारी याचिका मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे.

जीएसटी १ जुलैपासून लागू करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला विरोध करणारी याचिका मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे. आर्थिक वर्षाच्या मध्यातच करव्यवस्थेत अमूलाग्र बदल करण्याच्या निर्णयाने गोंधळ होण्याची शक्यता असल्याने सर्वसामान्यांना फटका बसेल असं या याचिकेत म्हणण्यात आलं आहे. त्यामुळे जीएसटीची अंमलबजावणी १ जुलैपासून करण्याऐवजी पुढील वर्षी १ एप्रिलपासून करण्याचे निर्देश द्यावेत अशी विनंती या याचिकेत करण्यात आली आहे. प्राध्यापक कनगसबापती पिल्लै यांनी वकील विनोद सांगवीकर यांच्यामार्फत ही याचिका दाखल केली आहे.

पिल्लई यांनी नेमकं याचिकेत काय म्हटलंय ?

- प्रत्येक राज्याकडून कसा प्रतिसाद मिळेल याविषयी संभ्रमावस्था

Loading...

- विविध घटकांनी नोंदवलेल्या आक्षेपांचं निराकरण सरकारकडून नाही

- आर्थिक वर्ष सुरू झाल्यानंतर पहिल्या तीन महिन्यांतील उत्पादनांवरील कर आणि त्याच्या किंमती आणि १ जुलैनंतर निर्माण होणारी उत्पादनं आणि त्याची करव्यवस्था याबद्दल कंपन्या आणि सेवा क्षेत्रातील कंपन्यांमध्ये गोंधळ

एकंदरीतच काय तर जीएसटीबद्दल सगळीकडेच उत्सुकता तसंच गोंधळ आहे. त्या पार्श्वभूमीवर कोर्ट नेमकं काय म्हणतंय हे पाहाणं महत्त्वाचं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 27, 2017 09:14 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...