जीएसटीचे दर झाले निश्चित, दूध, चहा-कॉफीसारखे खाद्य पदार्थ होणार स्वस्त

जीएसटीचे दर झाले निश्चित, दूध, चहा-कॉफीसारखे खाद्य पदार्थ होणार स्वस्त

 • Share this:

19 मे : केंद्र सरकारकडून जीएसटीचे दर जाहीर झाले आहेत. एकूण 1211 वस्तूंमधून सात वस्तूंना पूर्णपणे करमुक्त करण्यात आलंय. यात धान्य आणि दुधाचा समावेश आहे. खोबरेल तेल, टूथपेस्ट आणि साबणासारख्या वस्तूंवर जीएसटीमध्ये 18 टक्के कर लागेल. तर साखर, चहा, कॉफी, खाद्य तेल आणि कोळशावर 5 टक्के कर लागेल. सोने आणि विडीवर कराचा दर ठरवण्यावरून एकमत बनले नाही. त्यामुळे त्याबद्दल आज निर्णय अपेक्षित आहे.

जीएसटी अंतर्गत बहुतांश वस्तूंवर 5, 12, 18, आणि 28 टक्क्यांच्या कराचा दर केंद्र आणि राज्याने निश्चित केला आहे. श्रीनगरमध्ये अर्थमंत्री अरूण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली, गुरूवारी सुरू झालेल्या दोन दिवसीय जीएसटी परिषदेत, दररोजच्या वापरातील वस्तूंवरील कराचे दर घटवण्याचा निर्णय घेण्यात आला.

एकूण 1200हून अधिक वस्तूंवरील जीएसटीचे दर प्रत्यक्षात कमी होतील. आता जो टॅक्स आकारला जातो,त्यापैकी कोणत्याही वस्तूंवरील कर वाढलेला नाही, उलट कमी झाला आहे. यामुळे करचोरीला आळा बसेल, असे अरूण जेटली यांनी सांगितले. नव्या कर रजनेनुसार, अनेस वस्तूंच्या किंमती स्वस्त होण्याची शक्यता आहे. दूध आणि अन्नाधान्य करमुक्त करण्यात आले आहे. शिवाय प्रोसेस्ड फूडही स्वस्त होणार आहे. देशात 1 जुलैपासून जीएसटीची अंमलबजावणी होणार आहे.

जीएसटीचे दर जाहीर - 5% कर

 • चहा
 • साखर
 • कॉफी
 • खाद्यतेल
 • कोळसा
 • औषधं
 • मिठाई
 • मसाले

जीएसटीचे दर जाहीर - 18% कर

 • केसांचं तेल
 • टूथपेस्ट
 • साबण
 • मनोरंजन

जीएसटीचे दर जाहीर - 28% कर

 • एसी
 • फ्रीज
 • छोट्या कारवर 28% करासह सेस

जीएसटीसाठी चार टप्पे करण्यात आले आहेत.

जीएसटीचे 4 टप्पे :

 • 14 टक्के वस्तूंवर 5 टक्के
 • 17 टक्के वस्तूंवर 12 टक्के
 • 43 टक्के वस्तूंवर 18 टक्के
 • 19 टक्के वस्तूंवर 28 टक्के

First published: May 19, 2017, 12:27 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading