S M L

पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत नाहीच!,अर्थ सचिवांचं स्पष्टीकरण

वस्तू सेवा कर जीएसटी लागू होण्यास एक वर्ष पूर्ण होत आहे. या निमित्ताने सीएनबीसी-टीव्ही 18 ने 'जीएसटी डिकोडेड' या कार्यक्रमाचे आयोजन केले होते

Sachin Salve | Updated On: Jun 28, 2018 11:27 PM IST

पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत नाहीच!,अर्थ सचिवांचं स्पष्टीकरण

नवी दिल्ली,28 जून :  सिलेंडर आणि विमानाच्या इंधनाला जीएसटीच्या कक्षेत आणता येईल पण पेट्रोलियम पदार्थांना जीएसटीच्या कक्षेत आणता येणार नाही असं स्पष्टीकरण  अर्थ सचिव हसमुख अडिया यांनी दिलं. तसंच 28 टक्के लागू असलेल्या वस्तूंवर कर कमी करता येऊ शकतो असे संकेतही त्यांनी दिले.

वस्तू सेवा कर जीएसटी लागू होण्यास एक वर्ष पूर्ण होत आहे. या निमित्ताने सीएनबीसी-टीव्ही 18 ने 'जीएसटी डिकोडेड' या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी अडिया म्हणाले, "28 टक्के स्लॅबमधून वस्तू हटवणे हे आता व्यावसायिक वाटत आहे. टॅक्स स्लॅबमध्ये बदलण्याआधी महसूलाचा विचार केला पाहिजे."

जीएसटी रिटर्नचे नवे फाॅर्म जानेवारीपासून उपलब्ध होती. तसंच जीएसटीचं पालण होतं की नाही यासाठी कठोर कायद्याची गरज नाही तर मिळणारा डेटा हाच कायदा असणार आहे. त्यावरून सर्व काही स्पष्ट होईल असंही त्यांनी सांगितलं.

तसंच अनेक राज्यांना पुढील दोन-तीन वर्ष केंद्राकडून नुकसान भरपाई घेण्याची आवश्यकता नाही. पण पंजाब सारख्या राज्याला पुढील पाच वर्ष तरी केंद्राकडून आर्थिक मदत घ्यावी लागेल असंही अडिया म्हणाले.

या कार्यक्रमात केरळचे अर्थमंत्री थाॅमस इसाक यांनी जीएसटी लागू झाला ही चांगली गोष्ट आहे पण ज्या पद्धतीने तो लागू झाला ते योग्य नव्हतं. पहिलं वर्ष हे निराशजनक होतं अशी टीका त्यांनी केली. पेट्रोल आणि डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणले पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली.

Loading...
Loading...

हेही वाचा

स्विस बँकेतल्या भारतीयांच्या पैशात झाली वाढ

VIDEO : विमान कोसळण्याचा थरार सीसीटीव्हीत कैद

कपिल पाटील यांची विजयाची हॅट्ट्रिक,भाजप-सेना पराभूत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 28, 2018 08:15 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close