जीएसटीचा सावळा गोंधळ सुरूच, होऊ शकतो 'हा' बदल !

बिहारचे उपमुख्यमंत्री आणि जीएसटी काऊन्सिलचे सदस्य सुशील कुमार मोदी यांनी ही माहिती दिली.

News18 Lokmat | Updated On: Aug 4, 2018 04:58 PM IST

जीएसटीचा सावळा गोंधळ सुरूच, होऊ शकतो 'हा' बदल !

नवी दिल्ली, 04 आॅगस्ट : जीएसटीचा स्लॅब आता 12 ते 18 टक्क्यांऐवजी फक्त 14 ते 15 टक्के करण्याचा केंद्र सरकारचा विचार करत आहे. त्यामुळे फ्रीज, वॉशिंग मशिन्स, लहान टीव्ही अजून स्वस्त होण्याची शक्यता आहे. कमोडिटी आणि सर्व्हिस टॅक्स कौन्सिल 12 ते 18 टक्के टॅक्स स्लॅब काढून टाकून सरसकट 14 ते 15 टक्के टॅक्स स्लॅब आणण्याच्या विचारात केंद्र सरकार आहे. आज जीएसटी कौन्सिलची महत्त्वाची बैठक होणार आहे यात महत्त्वाचे निर्णय होऊ शकतात. बिहारचे उपमुख्यमंत्री आणि जीएसटी काऊन्सिलचे सदस्य सुशील कुमार मोदी यांनी ही माहिती दिली. जीएसटीसाठी आयोजित केलेल्या एका परिसंवादाला संबोधित करताना मोदींनी ही माहिती दिली.

जीएसटी कौन्सिलच्या गेल्या महिन्यात झालेल्या बैठकीत रेफ्रिजरेटर्स, वॉशिंग मशिन्स, लहान टेलिव्हिजन सेट्स आणि पेंट यांसारख्या उत्पादनांना 18 टक्क्यांच्या स्लॅबमधून काढून टाकण्यात आलंय. त्यामुळे ते आणखी स्वस्त होण्याची शक्यता आहे. जुलै महिन्यामध्ये जीएसटी संकलनात 96,483 कोटी रुपये उभे झाले होते तर जूनमध्ये 9610 कोटी रुपयांची पातळी गाठली होती.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लवकरात लवकर एक लाख कोटींचे लक्ष्य प्राप्त करण्याचं सरकारचं लक्ष्य आहे. त्यानंतरच हे जीएसटी स्लॅब्स बदल शक्य आहे.

दरम्यान, जीएसटी कौन्सिलची आज 29 वी महत्त्वाची बैठक होत आहे. या बैठकीत लघू उद्योजकांवर चर्चा होणार आहे. अर्थमंत्री पियूष गोयल यांच्या अध्यक्षतेखाली ही दुसरी बैठक होणार आहे. मागील 28 व्या बैठकीत सर्वसामान्यांना गरजेची असलेल्या 50 हून अधिक वस्तू आज 27 जुलैपासून स्वस्त करण्याचा निर्णय घेतला गेला. मागील आठवड्यात जीएसटी काऊंसिलची बैठक पार पडली होती. या बैठकीत जवळपास 100 वस्तूंवर जीएसटी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. अर्थमंत्री पियूष गोयल यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या या बैठकीत सॅनिटेरी नॅपकीन जीएसटीमुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसंच 1000 रुपयापेक्षा कमी किंमतीचे बुट-चप्पलांवर 5 टक्के जीएसटी कमी करण्यात आला. तसंच वाॅशिंग मशीनवर टॅक्स 28 टक्क्यांवरून 18 टक्के करण्यात आला. तसंच जीएसटी रिटर्न ही तीन महिन्यातून एकदाच भरावे लागणार आहे.

सॅनिटरी नॅपकीन आणि देवीदेवतांचे फोटो मूर्ती जीएसटीतून वगळण्यात आलंय. फ्रीज, वाशिंग मशीनसह 36 वस्तूंवरच्या जीएसटीत कपात करण्यात आली आहे. जीएसटीतील बोज्यामुळे त्रस्त असलेल्या नागरिकांना केंद्र सरकारने हा दिलासा दिलाय. शनिवारी राजधानी दिल्लीत झालेल्या 28व्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत नागरिकांना दिलासा देणारे अनेक निर्णय घेतले गेले.

हेही वाचा

 टीव्ही अभिनेत्री रूपाली गांगुलीवर हल्ला करणाऱ्या 2 हल्लेखोरांना अटक

सासरच्यांनी विवाहितेला खांबाला बांधून जिवंत जाळलं,आरोपी अजूनही मोकाटच

फ्रेंडशिप डेच्या आधीच प्रेमाचा स्वीकार नाही केला म्हणून मैत्रिणीचा खून

 पिंपरी चिंचवडमध्ये रिक्षावाले बनले महापौर, राहुल जाधव 80 मतांनी विजयी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 4, 2018 04:58 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close