• Home
 • »
 • News
 • »
 • news
 • »
 • 'जीएसटी'त झाला बदल, 'या' 36 वस्तू झाल्या स्वस्त !

'जीएसटी'त झाला बदल, 'या' 36 वस्तू झाल्या स्वस्त !

फ्रीज, वाशिंग मशीनसह 36 वस्तूंवरच्या जीएसटीत कपात करण्यात आली आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 21 जुलै : सॅनिटरी नॅपकिनवरचा जीएसटी अखेर रद्द करण्यात आलाय. जीएसटी कौन्सिलने शनिवारी राजधानी दिल्लीत हा निर्णय घेतला. सॅनिटरी नॅपकिन यापुढे करमुक्त असणार आहे. व्यक्तिगत स्वछतेसाठी सॅनिटरी नॅपकिनवरचा जीएसटी रद्द करावा अशी मागणी अनेक महिला संस्था संघटनांनी महाराष्ट्र सरकारकडे केली होती. अनेक महिला लोकप्रतिनिधी, संस्था यांनी याविरोधात आंदोलनही केली होती. राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यासाठी पाठपुरावा केला. कौन्सिलने शनिवारी झालेल्या बैठकीत ही मागणी मान्य करून महिलांना एक मोठी भेट दिली अस म्हटलं पाहिजे. ग्रामीण भागातील गोरगरीब, आर्थिक दुर्बल घटकात महिलांना याचा मोठा फायदा होईल. सॅनिटरी नॅपकीन्स जीएसटीमुक्त,केंद्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय सॅनिटरी नॅपकीन आणि देवीदेवतांचे फोटो मूर्ती जीएसटीतून वगळण्यात आलंय. फ्रीज, वाशिंग मशीनसह 36 वस्तूंवरच्या जीएसटीत कपात करण्यात आली आहे. जीएसटीतील बोज्यामुळे त्रस्त असलेल्या नागरिकांना केंद्र सरकारने हा दिलासा दिलाय. शनिवारी राजधानी दिल्लीत झालेल्या 28व्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत नागरिकांना दिलासा देणारे अनेक निर्णय घेतले गेले. जीएसटीतून या वस्तू मुक्त - सॅनिटरी नॅपकीन जीएसटीतून वगळले संपूर्ण करमुक्त - दगडी, लाकडी, मार्बलच्या मूर्ती जीएसटीतून वगळल्या - सिम्पल रिटर्न फायलिंगला मंजुरी - इथेनॉलवरचा जीएसटी 18 वरून 5 टक्क्यांवर - फ्रीज, वॉशिंग मशीन, ज्युसर, मिक्सर सह 17 वस्तूंचा जीएसटी 18 टक्क्यांवर - एक हजार रुपयांपर्यतचे पायताण वर केवळ 5 टक्के कर - पेंट, वार्णिश वरचा जीएसटी 28 वरून 18 टक्के - बांबू फ्लोअर जीएसटी 12 टक्क्यांवर - हँडिक्राफ्ट हँडलूमवरच्या जीएसटीत कपात 28 टक्क्यांहून 18 टक्क्यांवर - लिथियम बॅटरी, टीव्ही, व्हॅक्युम क्लीनर, फ्रुड ग्राइंडर, मिक्सर, स्टोरेज वाटर हिटर, हेड ड्रायर, हँड ड्रायर, पेंट, वार्निश, वॉटर कूलर, मिल्क कूलर, आइसक्रीम कूलर, परफ्युम्स, टॉयलेट स्प्रे या वस्तूंवर 12 टक्के जीएसटी  हँडबॅग्स, ज्वैलरी बॉक्स, पेंटिंगसाठी वापरले जाणारे लाकडी बॉक्स, आर्टवेयर ग्लास, हँडमेड लॅप्स या जीएसटीतील दरकपातीमुळे केंद्र सरकारला 20 हजार कोटींचे नुकसान होणार आहे. 27 जुलैपासून हे नवीन दर कपात लागू होईल.
  First published: