मुंबई, 21 फेब्रुवारी : टिकटॉकवर कधी कोणता व्हिडीओ व्हायरल होईल सांगता येत नाही. कधी या व्हायरल व्हिडीओमुळे तुम्ही प्रसिद्ध होता तर कधी ट्रोल. व्हायरल व्हिडीओवर कमेंट्सचा मात्र पाऊस कायम पडतो. असाच एक व्हिडीओ टिकटॉकवर व्हायरल होत आहे. फक्त टिकटॉकवर नव्हे तर फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हाट्सअपवर देखील हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर झाला आहे.
तर हा व्हिडीओ आहे एका लग्नाच्या वरातीतील. भारतामध्ये लग्न म्हणजे एक मोठा सोहळा असतो. लग्नाच्या वरातीमध्ये अनेक नमुने पाहायला मिळतात. मात्र या व्हायरल व्हिडीओमध्ये नवरोबाचीच फजिती झाली आहे. घोड्यावर बसलेल्या नवऱ्याला सारखं खाली उतरवल्यामुळे पुन्हा एकदा घोड्यावर चढताना नवरदेवाची फजिती झाली आहे. या फजितीनंतर नवऱ्याचा पारा चढला आणि वऱ्हाड्यांवरच त्याने आपला राग व्यक्त केला. नवदेवाचा हा आवेश पाहून हसू आल्याशिवाय राहणार नाही.
(हेही वाचा-2800 फुट उंचावरून या मुलीने केलं असं काही, VIDEO पाहून हृदयाचे ठोके नक्की वाढतील)
झालं असं की घोड्यावरून सारखं वर-खाली केल्यामुळे नवऱ्याची पँटच फाटली. त्यामुळे रागावून तो वऱ्हाड्यांना म्हणाला देखील, ‘माझी पँट फाटली आहे...’ आणि त्यानंतर तो दुसरी पँट आणण्याचे आदेशही वऱ्हाड्यांना देतो. या व्हिडीओला वरातीमधीलच कुणीतरी मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून टिकटॉकवर पोस्ट केलं आहे. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
@rahulgurjar3606 या युजरने टिकटॉकवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. 16.2 मिलियन युजर्सनी हा व्हिडीओ पाहिला असून 7 लाखांपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ लाइक केला आहे.
(हेही वाचा- VIDEO : 'मला मरायचं आहे...', मानसिक छळाला कंटाळून 9 वर्षाच्या मुलाची आईकडे मागणी)