News18 Lokmat

नातवांचा सांभाळ ही आजोबांची जबाबदारी नाही, आई-वडिलांचं कर्तव्य - कोर्टानं फटकारलं

नातवंडांचा सांभाळ करणं ही आजी आजोबांची जबाबदारी नसून ते मुलांच्या आई-वडिलांचं कर्तव्य आहे. आजी-आजोबा म्हणजे बेबी सिटर नाहीत. अशा शब्दात पुणे कौटुंबिक न्यायालयानं फटकारलं आहे.

Ajay Kautikwar | News18 Lokmat | Updated On: May 22, 2018 08:13 PM IST

नातवांचा सांभाळ ही आजोबांची जबाबदारी नाही, आई-वडिलांचं कर्तव्य - कोर्टानं फटकारलं

पुणे,ता.22 मे : नातवंडांचा सांभाळ करणं ही आजी आजोबांची जबाबदारी नसून ते मुलांच्या आई-वडिलांचं कर्तव्य आहे. आजी-आजोबा म्हणजे बेबी सिटर नाहीत. अशा शब्दात पुणे कौटुंबिक न्यायालयानं सासू-सासऱ्यांवर नातवंडांची जबाबदारी ढकलणाऱ्या महिलेची कान उघाडणी केली आहे.

आजी-आजोबानं नातीची काळजी घ्यावी, तिचा सांभाळ करावा, अशी मागणी करणारी याचिका पुण्याच्या कौटुंबिक न्यायालयात एका महिलेनं दाखल केली होती. मात्र न्यायालयानं त्या महिलेची कानउघाडणी करत तिची मागणी फेटाळून लावलीय.

अनेक घरात वृद्ध माता-पित्यांवर लहान मुलांचा सांभाळ करण्यासाठी जबरदस्ती केली जाते. कधी ही जबाबदारी भावनिक स्वरूपात असते कर कधी अडवणुकीच्या स्वरूपात असते. मात्र पुणे कौटुंबिक न्यायालयानं महत्त्वाचा निर्णय देऊन कर्तव्याची सीमारेषा अधोरेखित केलीय.

अनेकदा घरातल्या ज्येष्ठांना लहान मुलांचा सांभाळ करणं झेपत नाही. उतार वयात थोडं मोकळं राहावं, तिर्थयात्रेला जावं असं त्यांना वाटतं असते. मात्र अनेक घरांमध्ये लहान मुलांची सर्व जबाबदारी आजी-आजोबांवर ढकलून पालक मात्र आपल्या कामात व्यस्त राहतात अशा अनेक तक्रारी संस्था स्वयंसेवी संस्थांकडे येत असल्याची माहितीही पुढं आलीय.

 

Loading...

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 22, 2018 08:13 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...