S M L

धक्कादायक ! आजीच्या अनैतिक संबंधामुळे गेला 10 महिन्याच्या चिमुकलीचा जीव

आपल्या आजीच्या अनैतिक प्रेम संबंधामुळे 10 महिन्याच्या चिमुकलीला आपला जीव गमवावा लागला आहे.

Updated On: Aug 6, 2018 02:01 PM IST

धक्कादायक ! आजीच्या अनैतिक संबंधामुळे गेला 10 महिन्याच्या चिमुकलीचा जीव

नाशिक, 06 ऑगस्ट : आपल्या आजीच्या अनैतिक प्रेम संबंधामुळे 10 महिन्याच्या चिमुकलीला आपला जीव गमवावा लागला आहे. नाशिकच्या पंचवटी परिसरातील मायको दवाखान्‍याजवळ राहणार्‍या संगीता देवरे, त्यांची तान्ही मुलगी आणि आई या तिघींना जाळण्याच्या धक्कादायक प्रकार घडला आहे. यामध्ये 10 महिन्याची चिमुकली सिद्धी हिचा मृत्यू झाला, तर तिची आई आणि आजी 8० टक्क्यांपेक्षा अधिक भाजल्या आहेत. अनैतिक प्रेम प्रकरणातून हा प्रकार घडला आहे.

आपल्या प्रेयसीसह तिच्या मुलीला आणि नातीला जाळून आरोपी प्रियकर जलालुद्दीन हा सध्या फरार आहे. काल मध्यरात्रीचा हा सगळा प्रकार घडला. जखमींना जिल्‍हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या संपूर्ण प्रकारामुळे परिसरात खळबळ माजली आहे. सध्या प्रेमातून नात्यांचा जीव घेतला जातो आणि अशा घटनांनी वातावरण होतं.

संगीता या महिलेचं एका व्‍यक्‍तीबरोबर अनैतिक संबंध होते. रविवारी मध्यरात्री त्यांचे वाद झाल्यानंतर आई, मुलगी आणि नातीला आईच्या प्रियकराने जाळून ठार मारण्याचा प्रयत्‍न केला. यामध्ये बालिकेचा जळून मृत्यू झाला. प्रिती शेंडगे आणि तिची मुलगी 10 महिन्याची सिद्धी शेंडगे आपल्या आई संगिताला भेटण्यासाठी दोन दिवसापुर्वी नाशिकमध्ये आल्या होत्‍या.

यावेळी मध्यरात्री आईच्या प्रियकराबरोबर आईचा वाद झाल्यानंतर त्याने या तिघांनी जाळण्याचा प्रयत्‍न केला. या वादानंतर त्या प्रियकराने पहाटेच्या सुमारास बेडवर रॉकेल ओतून आपल्या प्रियेसी, तिच्या मुलीला आणि नातीला जिवंत जाळण्याचा प्रयत्‍न केला. यामध्ये 10 महिन्‍याच्या सिद्धीचा जळून मृत्यू झाला आहे, तर संगीता आणि प्रिती या 8० टक्‍क्यापेक्षा अधिक भाजल्या आहेत. या प्रकरणतील संशयित फरार आहे. पोलीस सध्या त्याचा कसून शोध घेत आहेत.

हेही वाचा...

Loading...
Loading...

शौचालयाच्या छतावर मोबाईल ठेऊन 'तो' करायचा महिलांची व्हिडिओ रेकॉर्डिंग

PHOTOS : भाभीजींचे बोल्ड अंदाजातील फोटोज पाहुन तुम्ही व्हाल थक्क !

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 6, 2018 01:58 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close