• Home
  • »
  • News
  • »
  • news
  • »
  • हयातीच्या दाखल्यासाठी 70 वर्षांच्या वयोवृद्धांना मारावे लागताहेत हेलपाटे

हयातीच्या दाखल्यासाठी 70 वर्षांच्या वयोवृद्धांना मारावे लागताहेत हेलपाटे

जिवंत असल्याचा पुरावा मिळवण्यासाठी 70 वर्षांच्या वयोवृद्धाला हेलपाटे मरावे लागत असतील तर ही बाब अत्यंत गंभीर आहे.

  • Share this:
बीड, 1 सप्टेंबर: ग्रामसेवकांच्या लेखणी बंद आंदोलनामुळे गावपाड्यातील शेकडो लोकांच्या कामाचा खोळंबा झाला आहे. ऐन हंगामाच्या काळात कागदपत्रे न मिळाल्याने वयोवृद्ध, शेतकरी, विधवा परित्यक्ता, महिलांच्या अडचणी वाढल्या आहेत. ग्रामपंचायत कार्यालयात चकरा मारूनही ग्रामसेवक हजर नसल्याने कामाचा खोळंबा झाला आहे. यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. बीड तालुक्यातील पेंडगाव येथील भगवान कोसले या 70 वर्षीय आजोबांना मागील 15 दिवसांपासून ग्रामपंचायत कार्यालयात अक्षरश: हेलपाटे मारावे लागत आहे. संजय गांधी निराधार योजनेच्या पगारासाठी त्यांना हयात असल्याचे प्रमाणपत्राची आवश्यकता आहे. हयातीचे प्रमाणपत्र त्यांना बँकेत द्यायचे आहे. जिवंत असल्याचा पुरावा मिळवण्यासाठी 70 वर्षांच्या वयोवृद्धाला हेलपाटे मरावे लागत असतील तर ही बाब अत्यंत गंभीर आहे. विशेष म्हणजे भगवान कोसले यांना घरकुल मंजूर आहे. त्याचे अर्धवट बांधकाम झाले त्याचे पुढील हप्ते देखील मिळाले नाहीत. ग्रामसेवकांची वाट पाहाण्यात दिवस निघून जात आहे. बहुतांश वयोवृद्धांना ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर बसून राहावे लागत आहे. महाराष्ट्र राज्यातील 27500 ग्रामपंचायतीत 22000 ग्रामसेवक कार्यरत आहेत. बीड जिल्ह्यातील एकूण 1024 ग्रामपंचायतीत कार्यरत 712 ग्रामसेवकांनी लेखणी बंद आंदोलन सुरू केले आहे. मागील पंधरा दिवसांपासून ते कार्यालयात फिरकलेच नाहीत. त्याचा परिणाम लोकांच्या रोजच्या कामावर झाला आहे. जन्मदाखला, रहिवाशी, हयात प्रमाणपत्र, पीटीआर नक्कल, ना हरकत प्रमाणपत्र, लाईट कनेक्शन, नळ कनेक्शनपासून ते कचरा नियोजन सगळ ढेपाळले आहे. ग्रामसेवक संवर्गातील कर्मचाऱ्यांनी प्रलंबित मागण्यासाठी असहकार व कामबंद आंदोलन पुकारले. यामुळे ऐन हंगामाच्या काळात शेतकऱ्यांची पंचाईत झाली. गावकरी संताप व्यक्त करत आहेत. महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटनेच्या वतीने आम्ही लेखणी बंद आणि काम बंद आंदोलन करत पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे शिक्के, चाव्या आणि कागदपत्रे जमा केले आहे. तसेच मागण्यासंदर्भात सर्व ग्रामसेवक एकत्रित आले आहे. मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत लेखणी हातात घेणार नाही, असा पवित्रा घेतल्याचे ग्रामसेवक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष सखाराम काशिद यांनी घेतला आहे. VIDEO: राजू शेट्टींवर टीका करताना सदाभाऊ खोत यांचा तोल सुटला
Published by:Sandip Parolekar
First published: