मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

'महात्मा जिंदा है', काँग्रेसच्या राज्यात गोडसेचे उदात्तीकरण; अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई

'महात्मा जिंदा है', काँग्रेसच्या राज्यात गोडसेचे उदात्तीकरण; अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई

काँग्रेसची सत्ता असलेल्या राज्यात मुखपत्रात लिहिण्यात आलेल्या लेखावरून वाद निर्माण झाला आहे. त्यातून नथुराम गोडसेचं उदात्तीकरण होत असल्याने अधिकाऱ्याला निलंबित केलं आहे.

काँग्रेसची सत्ता असलेल्या राज्यात मुखपत्रात लिहिण्यात आलेल्या लेखावरून वाद निर्माण झाला आहे. त्यातून नथुराम गोडसेचं उदात्तीकरण होत असल्याने अधिकाऱ्याला निलंबित केलं आहे.

काँग्रेसची सत्ता असलेल्या राज्यात मुखपत्रात लिहिण्यात आलेल्या लेखावरून वाद निर्माण झाला आहे. त्यातून नथुराम गोडसेचं उदात्तीकरण होत असल्याने अधिकाऱ्याला निलंबित केलं आहे.

  • Published by:  Manoj Khandekar

भोपाळ, दि. 25, प्रतिनिधी : महात्मा गांधी आणि नथुराम गोडसे हे विषय देशात स्वातंत्र्यांच्या 73 वर्षांनतरही चर्चेचे आणि काही वेळा वादाचे विषय राहीले आहेत. सध्या मध्यप्रदेशात महात्मा गांधीजांवर लिहीलेल्या एका लेखामुळे मध्यप्रदेश सरकारच्या माहिती आणि जनसंपर्क प्रमुखावर नोकरी गमावण्याची वेळ आली आहे. मध्यप्रदेश सरकारच्या मुखपत्रात राज्याच्या माहिती आणि जनसंपर्क विभागाच्या संचालकांनी एका अधिकऱ्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.  मुखपत्राचे संपादक असलेल्या मनोज खरे यांच्यावर महात्मा गांधीजींवर सरकारच्या मासिकात छापण्यात आलेल्या एका लेखाबद्दल निलंबनाची कारवाई केली.

‘महात्मा जिंदा है’ असा लेख मध्यप्रदेश सरकारच्या मुखपत्रात छापण्यात आला आहे. श्वेता राणी यांनी लिहिलेल्या या लेखामध्ये , ‘व्हाय आय किल्ड गांधी’या नथुराम गोडसेच्या पुस्तकातील काही मजकूर दाखला म्हणून दिला आहे. याशिवाय, ‘काहींसाठी गोडसे एक मारेकरी आहे पण काहींसाठी तो सन्मानपूर्वक धर्म धारण करणारा हुतात्मा आहे. गोडसे याच्या मते गांधीजी काही बाबतीत योग्य होते पण त्यांच्या धोरणांमुळे काही लोकांवर अन्याय झाला.’ अशा प्रकारचं विधान केलं आहे. इतकंच नाही तर, ‘गांधींचे निधन 30 जानेवारी 1948 रोजी झाले असले किंवा गोडसेचे 15 नोव्हेंबर 1948 ला झालं असलं तरी गांधी आणि गोडसे अनेकांच्या मनात कायम आहेत. त्या दोघांपैकी कोणाचं अनुकरण करायचं हे आपल्यावर आहे.’

उद्धव ठाकरे सरकारचा आणखी एक U टर्न; आपलाच निर्णय मागे घेण्याची नामुष्की

प्रकाशनानंतर झाली कारवाई

श्वेता राणी यांनी लिहीलेला हा लेख सरकारच्या मुखपत्रात प्रसिद्ध झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. या लेखात नथुराम गोडसेच्या भावाने लिहीलेल्या पुस्तकातील काही दाखले देण्यात आले आहेत. याप्रकरणी मासिकाचे संपादक असलेल्या मनोज खरे यांच्यावर कारवाई झाली. ते राज्य सरकारच्या माहिती जनसंपर्क विभागाचे प्रमुख आहेत. या लेखात देण्यात आलेल्या दाखल्यानुसार, ‘गोडसेच्या मते  गांधीजींनी हिंदूंच्या हिताचे वारंवार गळा आवळला. देशाच्या फाळणीत महात्मा गांधींजींची भूमिका होते. गोडसेने त्याच्या जीवनाचे एकमात्र उद्दीष्ट हिंदू आणि हिंदुत्वाचे रक्षण करणे असल्याचं होतं असं म्हटलं होतं आणि यातूनच संपूर्ण स्वातंत्र्य मिळू शकले असते. त्यानंतर त्यांनी गांधींनाच ठार मारण्याचा संकल्प केला.’

लेख प्रकाशित झाल्यानंतर यावरून वाद निर्माण  झाला. याची दखल घेत

याप्रकरणी तडकाफडकी खरे यांना निलंबित करण्यात आलं आहे. याबाबत खरे यांनी म्हटलं की, लेखाची सुरुवात गांधींजींच्या तत्वांची आणि त्यांच्या कार्याची माहिती देत केली आहे. यात गोडसेच्या उद्दातीकरणाबाबत काही नाही. तसंच यात गोडेसेने कसं चुकीच्या पद्धतीने बाजू मांडली हेसुद्धा लिहिल्याचं खरे यांनी सांगितलं आहे. याआधी गेल्या वर्षी भाजपच्या खासदार प्रज्ञासिंग ठाकूर यांनी नथुराम गोडसे देशभक्त असल्याचं विधान केलं होतं आणि देशात वादंग निर्माण झाला होता.

जेव्हा पंतप्रधान मोदींचा मित्र त्यांना धोका देतो, बिहारचा NRC विरोधात ठराव

First published: