S M L

राज्यातल्या गारपीटग्रस्तांना प्रतिहेक्टरी 13,500 हजारांची मदत जाहीर

गारपीटग्रस्तांसाठी सरकारने आज तातडीने अनुदान जाहीर केलंय. कोरडवाहूसाठी प्रति हेक्टरी 6 हजार रुपये तर जिरायतीसाठी प्रति हेक्टरी 13,500 रुपये मदत जाहीर करण्यात आलीय.

Chandrakant Funde | Updated On: Feb 14, 2018 04:12 PM IST

राज्यातल्या गारपीटग्रस्तांना प्रतिहेक्टरी 13,500 हजारांची मदत जाहीर

14 फेब्रुवारी, मुंबई : गारपीटग्रस्तांसाठी सरकारने आज तातडीने अनुदान जाहीर केलंय. कोरडवाहूसाठी प्रति हेक्टरी 6 हजार रुपये तर जिरायतीसाठी प्रति हेक्टरी 13,500 रुपये मदत जाहीर करण्यात आलीय. गारपिटीमुळे पहिल्या दिवशी मराठवाडा आणि विदर्भात 1.27 लाख हेक्टर क्षेत्र बाधीत झालंय तर दुसऱ्या दिवशी 64 हजार हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय. मोसंबी आणि संत्र्या उत्पादकांना हेक्टरी २३ हजार ३००, केळी उत्पादकांना हेक्टरी ४० हजार, आंब्याला हेक्टरी ३६ हजार ७०० रुपये भरपाई मिळणार आहे. विमा नसललेल्या फळबाग शेतक-यांनाही हेक्टरी अठरा हजाराची मदत मिळणार आहे.

पीकविमा, आणि एनडीआरएफच्या नियमानुसार ही शासकीय मदत दिली जाणार आहे. गेल्या आठवड्यात मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. त्यात फळबागांसह, रब्बी हंगामातील पिकांचं अतोनात नुकसान झालंय. हातातोंडाशी आलेलं पीक गारपिटीमुळे उद्धवस्त झालंय. फळबागांचीही मोठी नासधूस झालीय. त्यावर सरकारने तात्काळ शेती पिकांच्या नुकसानभरपाईचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यानुसार गारपिट ग्रस्तांसाठी ही तातडीची मदत जाहीर करण्यात आलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 14, 2018 04:12 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

Live TV

News18 Lokmat
close